नागरसोगा येथे वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे उद्घाटन
औसा प्रतिनिधी
प्रदेश अध्यक्षा रेखा ठाकूर लातूर दौर्यावर आल्या होत्या तेंव्हा पासून लातूर जिल्ह्यात महिला कार्यकारिणी युवा कार्यकारिणी त्या नंतर आता वार्ड तिथे बोर्ड गाव तेथे शाखेचे उद्घाटन जिल्हाभर सुरू आहे जिल्हा अध्यक्ष जगदीश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक कार्यकर्ते सर्व जाती धर्माचे वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश करीत आहेत.
वंचित बहुजन आघाडी औसा तालुक्यातील नागरसोगा येथे आज वार गुरुवार दि 23 सप्टेंबर रोजी शाखेचे उदघाटन झाले मान्यवर उपस्थित जि. अध्यक्ष जगदीश माळी, जि. महासचिव डॉ तात्याराव वाघमारे, जि. प्रवक्ते क्षीरसागर , ता.अध्यक्ष शिवरूद्र बेरूळे, महासचिव सुभाष भालेराव, जि. उपाध्यक्ष सतिश गायकवाड, जि. उपाध्यक्ष शाम पावले व ता. उपाध्यक्ष नागसेन गायकवाड, ता. उपाध्यक्ष इंद्रजीत जाधव ता. उपाध्यक्ष सूर्यकांत उबाळे व आडसुळे, भिमराव पाटील ता. संघटक दयानंद लांडगे आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते नागरसोगा चौकामध्ये बोर्डाचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी नागरसोगा शाखा अध्यक्ष म्हणून मोजम पटेल यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्ष म्हणून अक्षय चाबुकस्वार, माणिक अडसूळे, शेरोपद्दीन पठाण यांची निवड करण्यात आली , महासचिव म्हणून किरण कांबळे, सचिव अशोक चाबुकस्वार, भीमा अडसूळे, जींदावली शेख यांची
निवड करण्यात आली . महासचिव म्हणून शेख रफीक, जहाँागी र शेख, संतोष कोळी, करण गायकवाड, कोषाध्यक्ष माधव चाबुकस्वार यांची निवड करण्यात आली , संघटक म्हणून तेजस अडसूळे, प्रताप कांबळे, दिनेश अडसूळे, नीलेश कांबळे आदी कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.