लातूर महानगरपालिकेने 408 कर्मचार्‍यांना स्थायी करून त्यांचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडवावा

 लातूर महानगरपालिकेने 408 कर्मचार्‍यांना स्थायी करून त्यांचा कायमस्वरूपी प्रश्‍न सोडवावा



लातूर ः गेल्या 25 वर्षापासून रोजंदारीवर असलेले मनपाचे 83 कर्मचार्‍यांना अकृतीबंद पध्दतीने समावेश करून त्यांना काम आदेश दिला. तसेच 408 कर्मचार्‍यांना निवृत्ती वेतन मंजुर केले. महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती दिली. सर्व कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर अदा करून त्यांची थकबाकी पुर्ण केली. या सर्व कामाबद्दल महाराष्ट्र राज्य नगर परिषद/नगर पंचायत ड वर्ग महानगरपालिका, संवर्ग कर्मचारी कामगार संघटना लातूर यांच्यावतीने महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांचे कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून आभार व्यक्त केले. दिवंगत आदरणीय माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेब यांनी 2003 साली 408 कर्मचार्‍यांची भरती केली होती पण ते आजपर्यंत अस्थायी म्हणून काम करीत आहेत. महापालिकेत अकृतीबंधमध्ये सफाई कर्मचार्‍यांचे शासन निर्णय क्रमांक ला.प.न.पा./212/26/1/प्र.क्र.40/न.वि.24 दि.28 मे 2013 मध्ये वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) यांचे पथक विभाग यांचे एकूण 849 जागा शिल्लक आहेत. त्यामध्ये जर आपण सदरील 408 कर्मचार्‍यांचे समावेश करून घेण्यात यावे ते सुध्दा स्थायी कर्मचारी म्हणून राहतील व त्यांच्या पाल्यास लाडपागे कमिशनद्वारे त्यांच्या रिक्त जागी घेण्यात यावे व गोरगरीब सफाई कर्मचार्‍यांचे काम होईल. तसेच केंद्र शासनाप्रमाणे महानगरपालिकेतील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करून उपकृत करावे व अकृतीबंधामध्ये 408 कर्मचार्‍यांना स्थायी करून त्यांचा कायमस्वरूपी प्रश्‍न मार्गी लावावा अशी निवेदनाद्वारे महापौर श्री विक्रांत गोजमगुंडे यांच्याकडे कर्मचार्‍यांनी प्रत्यक्ष भेटून मागणी केली आहे. याप्रसंगी श्री विक्रांत गोजमगुंडे यांनी सर्व कर्मचार्‍यांना तुमच्या सर्व मागण्या  मंजुर करण्यात येतील व मार्गी लावण्यात येईल असे आश्‍वासन याप्रसंगी दिले.
यावेळी संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष श्री बालाजी कोंबडे, प्रदेश सल्लागार शिवमुर्ती पवार, अंकुश गायकवाड, पंडीत पवार, विठ्ठल कांबळे, सदोद्दीन शेख, बसवेश्‍वर कोरके, दिलीप गायकवाड, कमलाकर जोगदंड, विमलबाई कांबळे, सुभाष कांबळे, खाजाबी शेख आदि कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या