औसा तालुक्यातील कु. पूजा कदम रा.टाका हिने युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे ग्रामीण भागातील मुलींना एक नवीन आदर्श घालून दिला

 औसा तालुक्यातील  कु. पूजा  कदम रा.टाका  हिने युपीएससी  परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे  ग्रामीण भागातील मुलींना एक नवीन आदर्श घालून दिला.
चार मुली असताना देखील आई वडिलांनी चारही मुलीना चांगल्या प्रकारचे शिक्षण दिले.









औसा प्रतिनिधी विलास तपासे

टाका येथील अशोक कदम यांनी गावातील भीमाशंकर विद्यालयात शिक्षक म्हणून काम केले. सन 2015-16 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यांची पत्नी संध्या या गृहिणी आहेत. कुटुंबातील केवळ चार एकर जमीन असल्याने या चारही मुलीना शिक्षण देण्यासाठी त्यांना सतत आर्थिक कसरत करावी लागत असे. असे असूनही त्याने या चारही मुलीना उच्चशिक्षण दिले. यामुळे या मुलीनी या कुटुंबाला कधीच मुलगा नसल्याची उणीव भासू दिली नाही. या चौघातील पूजा ही सर्वात लहान मुलगी. तिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण केशवराज विद्यालय लातूर येथे झाले. यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथील दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेत झाल्यानंतर पूजाने पुढील शिक्षणासाठी पुणे गाठले. कुटुंबाची व पूजाचे स्वप्नं युपीएससीचे असल्यामुळे पूजाने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेज मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. नंतर इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. यानंतर पुणे येथील एका खाजगी शिकवणीद्वारे तिने युपीएससी परीक्षेसाठी तयारी सुरू केली. दररोज तासनतास अभ्यास करणार्‍या पूजाची संधी या अगोदर एकदा एकदा झालेल्या युपीएससी हुकल्याने निराश न होता, या परीक्षेत पूर्ण तयारीनिशी उतरून देशात 577 क्रमांक पटकावला आहे. तिच्या या यशाने संपूर्ण लातूर जिल्ह्याची मान उंचावली आहे. कदम दाम्पत्याला चार मुली आहेत. यापैकी पहिली मुलगी जयश्री हिने एमएससी शिक्षण घेतले. यानंतर विवाह झाल्यावर काही वर्ष नेदरलॅंड येथे राहिल्यानंतर ती सध्या औरंगाबाद येथे स्थाईक आहे. दुसरी मुलगी पल्लवी हिने अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्या पुणे येथील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणुन सेवा बजावत आहेत. तर तिसरी मुलगी पूनम यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस व एमडीचे शिक्षण पूर्ण करून आपल्या जोडीदाराबरोबर पुणे येथे एक खाजगी रुग्णालय उभे केले आहे. टाका सारख्या एका छोट्या गावांत चार एकर जमीन व एका खाजगी संस्थेवर शिक्षक म्हणून सेवा बजावलेल्या एका शिक्षकाच्या मुलीने उच्च शिक्षण घेऊन यशाची घेतलेली भरारी ही नक्कीच कौतुकास्पद असून आता युपीएससी परीक्षेत पूजाने देशात 577 क्रमांक पटकावला असून या यशाचे कौतुक सर्वत्र केले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या