आगामी महापालिका निवडणुकीत 80% तरुणांना उमेदवारी देणार- संभाजी पाटील निलंगेकर..
लातूर- आगामी महापालिका निवडणुकीत 80 टक्के तरुणांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात येणार असून युवकांनी यासाठी पुढे यावे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी कामगार कौशल्य तथा लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी लातूर येथे केले.
लातूर येथील अनुसया मंगल कार्यालय येथे एकता प्रतिष्ठान च्या वतीने कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव आदी मान्यवर उपस्थित होते.
एकता प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून गणेश मंडळाच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत आहे. प्रेरणा ताई होनराव यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान काम करत आहे या वर्षी त्यांनी कोरोना काळात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करावा अशी संकल्पना त्यांच्या मनामधे निर्माण झाली आणि त्या माध्यमातून त्यांनी लातूर शहरात कोरोनाच्या काळात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांचा व व्यक्तींचा सन्मान केला.
यावेळी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव तथा मीडिया पॅनलिस्ट प्रेरणा होनराव मनोगत व्यक्त करताना म्हणाले की ,लातूर जिल्ह्यामध्ये माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मुळे मराठवाडा रेल्वे कोच फॅक्टरी आली असून येणाऱ्या काळात या कोचच्या माध्यमातून अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत यासाठी युवकांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असताना याकडे सुद्धा डोळस नजरेने लक्ष द्या व व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घेत त्यासोबत आपले देखिल उद्योग डोळसपणे उभे करावेत असे त्यांनी मनोगतात म्हटले आहे,सोबतच एकता प्रतिष्ठाचे कमी वेळेत उत्तम सामाजिक जाणिवा सांभाळत असल्याने कौतुक देखिल केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
या कार्यक्रमासाठी एकता प्रतिष्ठानचे श्री.विजय कस्पटे,श्री.वैभव पतंगे,श्री.आकाश मोरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता .
On Mon, 6 Sep 2021, 6:07 am Reliance Media, <rlp.media19@gmail.com> wrote:
आज दि. 05-09-2021 रोजी भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ शिक्षक दिन श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, रिलायन्स लातूर पॅटर्न येथे साजरा करण्यात आला, त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. उमाकांत होनराव सर, महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ सुलक्षणा केवळराम,
महाविद्यालयाचे अधीक्षक प्रा. श्रीकृष्ण जाधव, प्रा गोविंद पवार, प्रा. ज्ञानेश्वर पुरी व महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.
भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन याच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात. कारण डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला .
त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी झाले व पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर उच्च माध्यमिक शिक्षण मद्रास येथील ख्रिश्चन कॉलेजात. तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले व एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला.
मद्रास येथे प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली.
1931 साली इंग्लॅडने डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली.
1952 साली भारताचे पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. त्याचप्रमाणे 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते.
1957 च्या दुसर्या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला.
13 मे 1962 साली डॉ. राधाकृष्णन यांची राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली. 1967 साली निवृत्त झाले. त्यानंतर आंध्रराज्यातील तिरूपती या गावी 24 एप्रिल 1975 रोजी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.
.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.