रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण

 

रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने 
गरजू महिलांना शिलाई मशीनचे वितरण








लातूर : रोटरी क्लब लातूर सेंट्रलच्या वतीने नुकतेच गरीब व होतकरू महिलांना स्वयं रोजगाराचे साधन म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल , रोटरीचे प्रांतपाल डॉ. ओमप्रकाश मोतीपवळे  यांच्या हस्ते  शिलाई मशीनचे वितरण करण्यात आले. 
याप्रसंगी रोटरी क्लब लातूर सेंट्रलचे अध्यक्ष रो. राजगोपाल मुंदडा,सचिव रो. डॉ. संजय वारद ,  रो. नंदकिशोर लोया, रो. पुरुषोत्तम नॊगजा , माजी प्रांतपाल डॉ. हरिप्रसाद सोमाणी, सहाय्यक  प्रांतपाल संतोष कासले , उमाकांत मद्रेवार , रो. जहाकीर गोलंदाज, रो. मेहुल कामदार, रो. संजय बोरा, रो. जितेंद्र कोरे, रो. बाळासाहेब खैरे, रो. गुंडरे , रो. विष्णू सारडा आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. 
सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहे. कोरोनामुळे  अनेक घरातील कमावत्या, कर्त्या पुरुषांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत. अशा घरातील गृहिणींना तसेच समाजातील गरजू महिलांना  उदरनिर्वाहाचे साधन म्हणून, मदतीचा एक हात म्हणून शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. महिलांनाही समाजात सन्मानाने व स्वाभिमानाने जगता  यावे याकरिता ही मदत करण्यात आली.  गरजू महिलांना शिलाई मशिनसोबतच साड्यांचेही वितरण करण्यात आले. 
या उपक्रमाचे संयोजक रो. रघुराज बाहेती हे होते. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी रो. मन्मथ पोपडे, रो. लक्ष्मीकांत सोनी, रो. श्रीकांत बेळंबे, रो. शेळके, रो. खानापूरे , रो. पुष्कराज खुब्बा आदिंनी परिश्रम घेतले. 
-----------------------


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या