लातुर, रेणापूर तालुक्यासह जिल्हाभरात पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे प्रशासनाला आदेश


लातुर, रेणापूर तालुक्यासह जिल्हाभरात पावसाने

झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याचे

पालकमंत्री अमित विलासराव देशमुख यांचे प्रशासनाला आदेश












 

लातूर प्रतिनिधी (सोमवार दि. ६ सप्टेंबर २१)

   लातूर जिल्हात शनिवारी रात्रीपासून दमदार पाऊस पडला असून ११ महसुल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. दिर्घकाळाच्या विश्रातीनंतर पडलेल्या पावसाने जिल्हाभरातील शेतकऱ्यांच्या पिकांना दिलासा मिळाला आहे. तथापी यामध्ये लातूर, रेणापूर व देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील काही भागात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात माहिती मिळताच झालेल्या नुकसानीची पाहणी करून तातडीने नुकसानीचा अहवाल सादर करण्याचे आदेश, राज्याचे वैद्यकीय शिक्ष्‍ण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी प्रशासनाला दिले आहेत.

  गेल्या दोन तीन दिवसापासून लातूर जिल्हामध्ये चांगला पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी लातूर, रेणापूर, देवणी तालुक्यासह जिल्हाभरातील सर्वच तालुक्यातील काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील सर्व महसुल मंडळात गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा मोठया प्रमाणात पाऊस्‍ पडला आहे. लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी व लातूर ग्रामिणचे आमदार धिरज देशमुख यांनी पावसामुळे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळताच प्रशासनाला सदरील नुकसानीची भेट देऊन पाहणी करावी, या नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करावा असे आदेश दिले.

  जिल्हा प्रशासनाला पाहणीचे आदेश मिळताच लातुर तालुक्यातील गंगापूर व रेणापूर तालुक्यातील पोहरेगाव, दर्जीबोरगाव, गव्हाण, ब्रम्हवाडी, आंदलगाव येथील नुकसान झालेल्या ऊसासह खरीप पिकांची संबंधित विभागाचे अधिकारी व पदाधिकारी यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली.

  या नुकसानीची पाहणी लातूर जिल्हा नियोजन समिती सदस्य ट्वेंटीवन  शुगरचे व्हा. चेअरमन विजय देशमुख, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, विलास साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन रविंद्र काळे, लातूर उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, रेणापूर उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, लातूरचे तहसिलदार स्वप्नील पवार, रेणापूरचे तहसिलदार राहूल पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी राजेद्र कदम, प्रा. अरूण गुटटे, प्रभारी कृषी अधिकारी योगिता आरदवाड, रेणापूर तालुका कृषी अधिकारी नागरगोजे, मंडळ अधिकारी हिप्परगे, माजी उपसभापती बाळकृष्ण माने, रमेश थोरमोटे, डॉ. सतिश कानडे, तानाजी फुटाणे, सरपंच बाबू खंदाडे, किरण शिंदे, जानुमिया शेख, बलभीम शिंदे, सुधाकर शिंदे, विठठल गाडेकर, बिभीषन कदम, शरद माने, रामराव माने, भारत पवार, आकाश जाधव, ज्योतिराम चव्हाण, व्यंकट पवार, विनायकराव माने, विलास रोगे, बकंट माने, शिवाजी माने, सुरेश माने, भरतराव मोरे, भास्कर मोरे, संजय मोरे, विशाल मोरे, शहाजी मोरे आदी पदाधिकारी, अधिकारी, शेतकरी उपस्थित होते.

-------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या