भिंत कोसळून कुटुंब रस्त्यावर.
औसा
तालुक्यासह शहरात पावसाचा हाहाकार सुरू आहे. अनेक ठिकाणचे रस्ते, मोन्य वाहून गेल्या आहेत; तर पावसाने तालुक्यासह शहर गावांतील घरांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. दि. २७ सप्टेंबर २०२१ सोमवार रोजी रात्रीच्या
सुमारास औसा शहरातील कालन गल्लीतील शेख सलीम सत्तार यांच्या घराची दक्षिण बाजूची भिंत कोसळल्याने शेख कुटुंबिय उघड्यावर आले आहे तसेच शेख यांच्या घराच्या भिती ह्या विटा दगडाच्या बांधकामाचे असल्याने पावसाच्या पाण्याने घराच्या भिंतींनाही तडे गेले आहेत. त्यामुळे घराचे नुकसान झाले असून आता राहायचे कुठे, असा प्रश्न शेख कुटुंबासमोर आला आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.