१०० टक्के मुर्ती संकलन करणारे लातूर राज्यातील एकमेव शहर लातुरकरांचा भरघोस प्रतिसाद

 

१०० टक्के मुर्ती संकलन करणारे लातूर राज्यातील एकमेव शहर 

लातुरकरांचा भरघोस प्रतिसाद 

मनपाच्या १६ संकलन केंद्रावर हजारो मुर्तींचे संकलन









पर्यावरण संवर्धनात लातुरकरांचा उपक्रम राज्यास दिशादर्शक- महापौर

लातूर/प्रतिनिधी: मागील तीन वर्षांपासून सार्वजनिक ठिकाणी गणेश मुर्तींचे विसर्जन न करता १०० टक्के मुर्तींचे संकलन करणारे लातूर हे राज्यातील एकमेव शहर ठरले आहे. मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी विसर्जनाच्या दिवशी शहरातील नागरिकांनी हजारो मुर्ती मनपाच्या संकलन केंद्रात आणून जमा केल्या.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर मुर्ती संकलन करतानाच निर्माल्याचे वर्गीकरण केले. त्यापासून आता खत बनवला जाणार आहे. मुर्ती विसर्जन न करता त्या दान दिल्याबद्दल महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी शहरवासियांचे आभार मानले आहेत.
   पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमुर्तींचे पाण्यात विसर्जन न करता त्या मनपाच्या संकलन केंद्रात दान करण्याचे आवाहन मनपाच्या वतीने करण्यात होते. मागील तीन वर्षांपासून शहरात हा उपक्रम राबवला जात आहे. मागच्या दोन वर्षांप्रमाणेच यंदाही नागरिकांनी या उपक्रमाला जोरदार प्रतिसाद दिला.
मनपाने विसर्जनासाठी शहरात १६ ठिकाणी संकलन केंद्र उभारली होती. पालिकेचे सर्वच अधिकारी आणि कर्मचारी दिवसभर या ठिकाणी उपस्थित राहून मुर्तींचे संकलन करत होते. घरगुती गणेश मुर्तींसह सार्वजनिक मंडळाच्या मुर्तींचे संकलनही तेथे करण्यात आले.
 कर्मचाऱ्यांनी मुर्तींचे संकलन करतानाच सोबत येणाऱ्या निर्माल्याचे वर्गीकरण
केले. फुले, हार, कापड यासारख्या वस्तू वेगवेगळ्या केल्या. यातील निर्माल्यापासून खत बनवला जाणार असून ज्या वस्तुंचा पुनर्वापर शक्य आहे त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे.
 राज्यात सर्वत्र गणेशमुर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात.त्यातून पर्यावरणाचे प्रश्न उपस्थित होतात,
प्रदूषणही होते. ते टाळण्यासाठी मूर्ती पाण्यात विसर्जित न करता त्या मनपाला दान करण्याचा उपक्रम लातूर मनपा राबवित आहे. असा उपक्रम राबवणारी लातूर ही राज्यातील एकमेव पालिका आहे.

   हजारो मुर्तींचे संकलन ...
  मनपाच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरातील सर्वच नागरिकांनी मुर्ती दान केल्या. एकाही मुर्तीचे पाण्यात विसर्जन झाले नाही. या माध्यमातून दिवसभरात हजारो मुर्ती संकलित झाल्या. मुर्ती दान देणाऱ्या प्रत्येक नागरिकांची नोंद घेण्यात येत होती. एकूण किती मुर्ती संकलित झाल्या त्याची मोजदाद रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

   लातुरकरांचा दिशादर्शक पॅटर्न- महापौर
 पर्यावरणाचे रक्षण आणि प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमुर्तींचे विसर्जन न करता त्या दान कराव्यात असे आवाहन केलेले होते. नागरिकांनी त्याला भरभरून प्रतिसाद देत मुर्तींचे विसर्जन पाण्यात केले नाही. शिक्षण क्षेत्रातील लातुरचा पॅटर्न प्रसिद्ध आहे. आता लातुरकरांनी विसर्जनाचाही अनोखा पॅटर्न निर्माण केला आहे. याबद्दल  महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी लातुरकरांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या