बुधोडा येथे मोरया गणेश मंडळ तर्फे महाप्रसाद ..गणपती विसर्जन

 


बुधोडा येथे मोरया गणेश मंडळ तर्फे 

महाप्रसाद ..गणपती विसर्जन






लातूर प्रतिनिधी श्रीकांत चलवाड

अनंत चतुर्दशी, जाणून घ्या गणेश विसर्जनाची पद्धत…

   

औसा: तालुक्यातील बुधोडा येथे मोरया गणेश मंडळ तर्फे महाप्रसाद  करण्यात आला. नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला,आज   गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्ष चतुर्थीला म्हणजेच 10 सप्टेंबर 2021 रोजी सुरू झाली. आता अनंत चतुर्थीला बाप्पा आपल्या सर्व भक्तांचा निरोप घेईल. हिंदू श्रद्धेनुसार, विसर्जनासह तो आपल्या सर्व भक्तांच्या वेदना, दुःख आणि जीवनातील अडथळे घेऊन जातो. गणपतीला ज्ञान, शिक्षण, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच कारणामुळे त्याला गजानन, धूम्रकेतु, एकदंत, वक्रतुंड, सिद्धी विनायक इत्यादी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.मोरया गणेश मंडळाचे अध्यक्ष रुपेश पाटील, उपाध्यक्ष ओमकार भुते,सचिव विशाल भुते ,सदस्य ओमकार चलवाड,समर्थ बोबडे, प्रतिक गायकवाड,वेदांत भुते,सोहम ढोले,शशिकांत चामे,शंतनु बुधोडकर,हर्ष मिटकरी,विनोद भुते,वेदांत कदम उपस्थित होते.  गणेश प्रत्येकाला ज्ञान आणि बुद्धी प्रदान करतात. प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. आतापासून काही तासांनंतरच बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला जाईल.दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गणपतीची विधिवत स्थापना करण्यात आली. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वेळी गणपतीवर मोठ्या प्रमाणात धूम असली तरी आता ‘अनंत चतुर्दशी’च्या दिवशी बाप्पाचे विसर्जन..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या