खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांना परवाना घेणे बंधनकारक*

 *खाद्यपदार्थ व फळ विक्रेत्यांना परवाना घेणे बंधनकारक*






दि. - 30 - उस्मानाबाद - 


अन्न व औषध प्रशासनातर्फे 1 ते 7 ऑक्टोबर या कालवधीत अन्न परवाना आणि नोंदणीसाठी मोहीम राबविण्यात येणार आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व किरकोळ आणि घाऊक अन्न व्यवसायिक,हॉटेल व्यवसायिक,फळ विक्रेते,मद्य विक्रेते,केटरर्स,शालेय पोषण आहार अंतर्गत अन्न पुरवठा करणारे,डेअरी व्यवसायिक,स्वीट मार्ट,फिर्ते आणि इतर अन्न व्यवसायिकांना अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 नुसार परवाना किंवा नोंदणी घेवूनच व्यवसाय करणे बंधनकारक आहे.


ज्या अन्न व्यवसायिकाची वार्षिक उलाढाल  12 लाखांपेक्षा कमी आहे. त्यांनी 100 रुपये प्रती वर्ष भरून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आणि ज्यांची वार्षिक उलाढाल 12 लाखांपेक्षा जास्त आहे. त्यांनी 200  प्रती वर्ष, उत्पादक असल्यास तीन हजार रुपये प्रती वर्ष भरून अन्न परवाना घेणे आवशयक आहे.व्यवसायिकांनी परवाना अथवा नोंदणी किंवा नुतनीकरणासाठी www.foscos.fssai.gov.in या संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करावेत.नोंदणीसाठी अर्जदाराचा फोटो व आधार कार्ड,परवानासाठी अर्जदाराचा आधार कार्ड, जागेचा उतारा,भाडेपट्ट,ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेचा नाहरकत प्रमाणपत्र,दुकानाचा फोटो,ज्या ठिकाणी पाण्याचा वापर होतो. त्या पाण्याचा विश्लेषण अहवाल आवश्यक असेल.


अन्न पदार्थ उत्पादक,घाऊक विक्रेते यांनी अन्न पदार्थ फक्त नोंदणीकृत किंवा परवानाधारकास विक्री करणे तसेच तसेच अन्न पदार्थ खरेदी करतांना फक्त नोंदणीकृत किंवा परवानाधारकाकडूनच खरेदी करणे बंधनकारक आहे. असे आवाहन सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन उस्मानाबाद शि.बा कोडिगिरे यांनी केले आहे.



*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा

बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170

Mail :Laturreporter2012g@gmail. com

Web :www.laturreporter.in

 **उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या