पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी निलंगा तालुक्यातील गौर गावातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची केली पाहणी

 

पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी

निलंगा तालुक्यातील गौर गावातील अतिवृष्टीमुळे

नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची केली पाहणी











 

लातूर प्रतिनिधी (गुरूवार दि. ३० सप्टेंबर २१)

 अपघातग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याच्या परिभाषेत बसणारे हे अभूतपूर्व संकट असल्यामुळे शासन त्या दृष्टीने निश्चितपणे विचार करील अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी दिलीनदीकाठच्या शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीने विमा कंपन्यांनी कार्यवाही करावी असे निर्देशही याप्रसंगी दिले आहेत.

   पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी  निलंगा तालुक्यातील गौर येथे आज गुरूवार दि. ३० सप्टेंबर २१ रोजी सकाळी वरिष्ठ अधिकारी सहकार्यांसह जाऊन, अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केलीग्रामस्थशेतकरी यांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांना महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली.

  यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर, सचिव अभय साळुंके, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीशैल उटगे, मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपविभागीय अधिकारी निलंगा शोभा जाधव, निलंगा तहसीलदार गणेश जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एम.एम.पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, सुधाकर पाटील, तालुका कृषी अधिकारी निलंगा राजेंद्र काळे, काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी आदीसह महसूल कृषी सार्वजनिक बांधकाम विभागाचे व महाविकास आघाडीतील पक्षाचे विविध पदाधिकारी संबंधित अधिकारी उपस्थित होते

   पालकमंत्री श्री देशमुख यांनी गौर परिसरातील शेतकरी शिवाजी भोजने व भागवत सावंत यांच्या शेतात जाऊन अतिवृष्टी आणि मांजरा नदीला पूर आल्यामुळे झालेल्या सोयाबीन नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांना धीर दिला त्यांचे म्हणणे ऐकून घेतले शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग्वाही दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले शेतकऱ्यांचे नुकसान खूप झाले आहे. सगळी यंत्रणा तत्परतेने कार्यरत आहे. विमा कंपनी शेतकर्‍यांना नुकसानीचे अर्ज सुलभ पद्धतीने देण्यासाठी प्रयत्न करू तसेच अतिवृष्टीने ज्या भागात नुकसान झाले आहे. त्यांना सरसकट मदत करण्यासाठी शासन सकारात्मक आहे व  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यात तसेच महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी व महापुराने नुकसान झालेल्या कार्याचा आढावा घेतला आहे. मदत कार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्र व राज्य आपत्ती निकषानुसार मदत करण्यात येईल मराठवाड्यात जेथे नुकसान झाले आहे, तेथे येत्या मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन निर्णय घेतला जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

चौकट

  मसलगा मध्यम प्रकल्प परिसरातील नुकसान झालेल्या प्रकाश जाधव, गुरुनाथ जाधव शेतकऱ्यांचे सोयाबीन ऊस पिकाची पालकमंत्री ना. अमित देशमुख यांनी पाहणी केली. तसेच मुगाव, निटुर, ताजपुर रोड वरील महेश पाटील यांच्या शेतात जाऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली, आणि निटूर गाव परिसरातील मांजरा नदीचे पाणी ओढ्यात जाऊन बॅक वॉटर पाण्यामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.


 उजेड परिसरातील मांजरा नदीवरील पुलाची पाहणी करून नुकसान झालेल्या पुलाचे तातडीने दुरुस्ती करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या, तसेच ज्या शेतकऱ्यांनी पीकवीमा ऑनलाइन केंद्रामध्ये भरला आहे. परंतु त्या व्यक्तीने विमा कंपनी कडे त्या शेतकऱ्यांचे पैसे भरले नाहीत त्या व्यक्तीवर फौजदारी कारवाई सुरू आहे. परंतु शेतकऱ्यांना तातडीची मदत करण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री श्री देशमुख यांनी कृषी अधिकारी लातूर दत्तात्रय गावसाने यांना केल्या.
-----

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या