शैक्षणिक कामासह इतर कामासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र वेळेवर देण्याची मागणी - एमआयएम प्रभारी अफसर शेख

 शैक्षणिक कामासह इतर कामासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र वेळेवर देण्याची मागणी - एमआयएम प्रभारी अफसर शेख... 




औसा /प्रतिनिधी : - शैक्षणिक कामासह  इतर कामासाठी तहसीलच्या उत्पन्न प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने ते लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी औसा तहसीलदारांना दि. 30 सप्टेंबर 2021 गुरुवार रोजी एमआयएम प्रभारी अफसर शेख यांच्या वतीने तर्फे निवेदन देण्यात आले आहे. सध्याच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी लागणारे तहसीलच्या उत्पन्न प्रमाणपत्राची गरज आवश्यकता असल्याने तहसील कडून मिळणारे उत्पन्नाचे प्रमाणपत्र वेळेवर मिळत नसल्याने विद्यार्थ्यासह इतरांना उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने गैरसोय होत आहे. शैक्षणिक शिष्यवृत्ती, अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक दृष्ट्या दुर्गम मागास घटक शिष्यवृत्ती, बेगम हजरत महल शिष्यवृत्ती, अशा अनेक शैक्षणिक कामासाठी शासनाने घालून दिलेल्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची अट घातल्याने तहसील कार्यालय मार्फत मिळणाऱ्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्वरित उत्पन्नाच्या प्रमाणपत्राची उपलब्धता तहसीलदार औसा यांनी करून देऊन होणारी गैरसोय टाळावी असे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे. 

तालुक्यासह औसा शहर हे  अल्पसंख्यांक बाहुल शहर असून तालुका व शहर राहतील शैक्षणिक धारकासाठी चालू वर्षाकरिता 2021 - 22 शैक्षणिक शिष्यवृत्ती च्या कामासाठी औसा तहसील कार्यालयात सेतू केंद्रांमध्ये प्रचंड गर्दी निर्माण होत आहे. यावर उपाय म्हणून अजून एक सेतू सुविधा केंद्र उपलब्ध करून देऊन तहसीलच्या उत्पन्न प्रमाणपत्र मिळण्यासाठी तसेच इतर कामांसाठी लागणारे प्रमाणपत्राची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेऊन प्रमाणपत्र उपलब्ध करावे असे निवेदनावर एमआयएम तालुका प्रभारी अफसर शेख, सय्यद इम्रान शेख साबीर, शेख इरफान, शेख नाजम, सिद्दिकी मुखीद यांच्या  सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या