शासनाच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत एक अभियानावर काम करायची माझी इच्छा आहे पूजा कदम यांचा टाका ग्रामस्थांकडून नागरिक सत्कार

 शासनाच्या महिलांसाठी अनेक योजना आहेत एक  अभियानावर काम करायची  माझी इच्छा आहे 

पूजा कदम यांचा टाका ग्रामस्थांकडून नागरिक सत्कार






औसा प्रतिनिधी विलास तपासे

औसा तालुक्यातील टाका गावची रहिवासी पूजा कदम या युपीएससी उर्तीर्ण झाल्यामुळे टाका ग्रामस्थांच्या वतीने नागरिक सत्कार करण्यात आला

भिमाशंकर मंदिरामध्ये ग्रामपंचायत कार्यालय व

विविध विकास सोसायटी टाका यांच्या  संयुक्त विद्यमाने नागरिक सत्कार करण्यात आला. सरपंच लक्ष्मी बंडगर, उपसरपंच अतुल शिंदे, विविध विकास सोसायटीचे चेअरमन गोरख सावंत यांच्या हस्ते पूजा कदम  यांना शाल, श्रीफळ, पुष्प हार घालून, फेटा घालून सत्कार करण्यात आला त्यावेळी माजी सरपंच संदिपान शेळके, माजी सरपंच रामचंद्र शिंदे , राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष शिवाजी सावंत मारुती महाराज साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शाम भोसले

प्राध्यापक सुधीर पोदार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले, विलासराव देशमुख युवा मंचाचे अध्यक्ष रवी पाटील,  कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नामदेव माने, मारूती महाराज सहकारी साखर कारखान्याचे संचालक विलास पाटील ग्रामपंचायत सोसायटीचे सर्व सदस्य  उपस्थित होते 

त्यावेळी पूजा कदम म्हणाल्या की शासनाच्या अनेक योजना आहेत त्या योजना राबवल्या तर अनेक चांगले बदल घडू शकतात. ग्राम स्वराज्य अभियानामध्ये आपल्या ग्रामपंचायतीमधून निवडून येणाऱ्या महिलांसाठी खास कार्यक्रम राबवले जातील अशा प्रकारच्या अभियानावर काम करायची इच्छा आहे  माझा आदर्श ए. पी. जे. अब्दुल कलाम, अमेरिकेचे शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर आहेत. राजकीय घडामोडी घडत असतात. प्रशासन इम्पलिमेंट देण्यासाठी आहे राजकारण मायक्रोव्हेव बनवण्यासाठी आहे राजकीय लेव्हलला योजनांची सुधारणा होत आहे . परंतू इम्पलिमेंटची जबाबदारी प्रशासनाकडे आहे. प्रशासकीय इच्छाशक्ती व राजकीय इच्छाशक्ती यांच्या समन्वयक असला पाहिजे. एखादी गोष्ट जेव्हा घडत असते तेव्हा त्याला खूप दृष्टीकोन असतात. हे पहिल्यांदा शिकले. त्याबरोबर वाचन व अभ्यास. कोणतीही गोष्ट त्या ठिकाणी राहून पूर्ण केली पाहिजे.



एक लोकांचा गैरसमज आहे इंग्लिश मेडियम मधील शिक्षण पाहिजे शहरातील शिक्षक पाहिजे अनेक विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत शिकुण आयएएस आयपीस अधिकारी होतात यासाठी फक्त जिद्द, इच्छा शक्ती असली पाहिजे.

अडचणी बरेच येत असतात पण मला असे वाटते की प्रत्येक अडचणी बळ देत असतात. आयुष्यातील प्रत्येक क्षण हा आपल्याला समृध्द करणार असतो म्हणून आयुष्यातील प्रत्येक घटनेकडे सकारात्मक  दृष्टिकोन बघून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मानसिक स्थैर्य आणि फिजिकल फिटनेस कडे लक्ष द्यावे.

टाका ग्रामस्थांकडूण माझा सत्कार नसून त्या सत्कारांमध्ये माझ्या आईवडीलांचा व गावाचा सुध्दा मोठा वाटा आहे असा उद्गार पुजा कदम यांनी काढला


त्यावेळी कदम कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते पुजाचे वडिल अशोक कदम आई संध्या कदम तीन मुली त्यांचे पती अँड. मनोज कदम, आदि नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या