शिवसेना शहर संघटक पदी अ‍ॅड.मजहर शेख यांची निवड

 शिवसेना शहर संघटक पदी अ‍ॅड.मजहर शेख यांची निवड.






औसा (प्रतिनिधी ) : औसा शहरातील शिवसेनेचे कट्टर समर्थक अ‍ॅड.मजहर शेख यांच्या कार्यामुळे औसा शहरात केलेल्या वेगवेगळ्या कार्याची दखल घेऊन शिवसेना नेते तथा जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या उपस्थितीत शिवसेना शहर संघटक पदी निवड करण्यात आली. सविस्तर असे की,रविवार दि.26 रोजी औसा येथील विश्रामगृह येथे झालेल्या शिवसेना पदाधिकारी यांच्या बैठकीत औसा येथील विधिज्ञ तथा युवा नेते अ‍ॅड.मजहर शेख यांची शिवसेना शहर संघटक म्हणून तर उपशहर प्रमुख पदी गोविंद खंडागले,बालाजी माने,गणेश कलसे,सचिन पवार यांची निवड शिवसेना नेते तथा जिल्हा प्रमुख शिवाजी माने साहेब यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली.यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख अ‍ॅड.राहुल मातोलकर,शहरप्रमुख सुरेश दादा भूरे,जयश्रीताई उटगे,बंडू जी कोद्रे,संजय उजळंबे,नानाजी माने,युवासेना प्रमुख गणेश गायकवाड व इतर शिवसैनिक यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या