दारू आणि कोंबड्या सह महिला व अपंग यांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा

 








दारू आणि कोंबड्या सह महिला व अपंग यांचा धडकला भादा ठाण्यावर मोर्चा 

औसा प्रतिनिधी विलास तपासे /मुख़्तार मणियार




 लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा स्टेशन अंतर्गत असलेल्या 45 गावांमध्ये खुलेआम दारू विक्री होत असल्याने अनेकांचे संसार हे उध्वस्त होत आहेत यामुळे 45 गावातील महिला अपंग पुरुष युवक युवतीचा मोर्चा धडकला आहे



औसा तालुक्यातील भादा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापासून आज मोर्चाला सुरुवात केली या मोर्चात सहभागी असलेल्या महिलांनी अक्षरश: देशी दारूच्या बाटल्या व कोंबडी डोक्यावर टोपलीत मध्ये घेऊन भादा ठाण्यापर्यंत मोर्चा काढला या मोर्चामध्ये महिला युवक-युवती यांचा आक्रोश आणि संताप पाहायला मिळाला भादा ठाण्याच्या आवारातच मुख्य इमारती समोर अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर महिला सामाजिक कार्यकर्त्या प्रा सोनाली गुलगुले, माधुरी पाटील, राणी स्वामी, रामप्रसाद दत्त, प्रा विजय सुतार, चंद्रकांत ढवण यांच्यासह 45 गावातील महिला-पुरुष युवक-युवती व अपंग यांनी ठिय्या मांडला यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दारुमुळे कशा पद्धतीने कुटुंबाची राखरांगोळी होत आहे याबद्दल आक्रोश आणि संताप व्यक्त केला काही बेवड्यानी दारूच्या नादात शेती विकली तर महिला व मुलांना मारहाण हा नेहमीचा भाग आहे पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात अवैधपणे देशी-विदेशी दारूची खुलेआम विक्री होते या अवैध दारू विक्रेत्यांना पोलिस प्रशासनाकडून हप्ते घेऊन संरक्षण दिला जात असल्याचा आरोप आंदोलन कर्त्यांनी केला आहे लातूर जिल्ह्यात निखील पिंगळे यांनी पोलिस अधीक्षक पदांचा पदभार घेतल्यानंतर अवैद्य धंदे विरुद्ध मोठी मोहीम राबवत कारवाई सुद्धा केली यामुळे अवैध धंदेवाल्याचे  धाबे दणाणले पण भादा पोलीस स्टेशनच्या हद्दीत दारू गुटका मटका गांजा यांचे मोठ्या प्रमाणात विक्री होते वर्षाकाठी सरासरी 50 लोकांचा यात जीव जातो त्यावर अवलंबून असणारे 250 व्यक्ती यांचे देखील जीवन उद्ध्वस्त होतो यामुळे या ठाण्याच्या हद्दीत असलेले बीट अंमलदार गिरी आणि डोलारे यांची तात्काळ बदली करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सर्व अवैध धंदे बंद करावेत अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय

..............


आणि पहिल्याच दिवशी पोलिस अधिकाऱ्यांच स्वागत झाल दारू कोंबड्यासह महिलाच्या आंदोलनान

_________

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भादा पोलीस स्टेशन अंतर्गत 45 गावात मोठ्या प्रमाणात होत असलेली देशी विदेशी दारू सटका मटका गांजा यांची खुलेआमपणे विक्री होत असल्यामुळे मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये महिलांनी डोक्यावर टोपलीमध्ये कोंबड्या आणि देशी दारूच्या बाटल्या घेऊन ठाण्यावर धडकल्या आज प्रथमच भादा पोलीस स्टेशन येथे विलास नवले यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतले आणि त्यांचे स्वागत या मोर्चाच्या आक्रोश आणि संतापाने झाला या मोर्चा प्रसंगी आंदोलनकर्त्यांनी केलेले निवेदन यावरून आपण 45 गावात सर्व अवैद्य धंदे कोण व कशा पद्धतीने चालवत आहे त्यांचा तात्काळ आढावा घेणार आहोत सोबतच अशा सर्व व्यक्तींना हद्दपार करण्यासाठी पोलिसांची प्रशासकीय कार्यवाही करण्यात येणार असल्याचा अभिवचन त्यांनी उपस्थित मोर्चेकरयांना दिले तर  दुसरीकडे या गावातील कोणत्याही महिलांना अवैध धंदामुळे किंवा कुटुंबातील मद्यपी कडून त्रास होत असल्यास तात्काळ मोबाईलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले यावर पोलीस तात्काळ कार्यवाही करण्याचे वचन देखील नवनियुक्त सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास नवले यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या