*जिल्हा स्त्री रुग्णालयात मातृवंदन सप्ताहाचे उद्घाटन*
दि. 2 - उस्मानाबाद -
उस्मानाबाद येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात प्रधानमंत्री मातृ वंदना योजना अंतर्गत “मातृ वंदना सप्ताह 2021” कार्यक्रम काल घेण्यात आला. या कार्यक्रम योजनेंतर्गत पात्र (गरोदर माता) लाभार्थी यांना सुरक्षित मातृत्व आणि योजनेच्या लाभा विषयी माहिती देण्यात आली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अति.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हालकुडे तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ.मिटकरी उपस्थित होते. यावेळी डॉ. मिटकरी यांनी गरोदर आणि स्तनदा माता यांच्यासाठी ही योजना लाभदायक असल्याचे सांगून मातांना त्यांच्या बुडीत रोजगाराची अंशत: पूर्तता करण्यासाठी आणि बालमृत्यूच्या वाढत्या संख्येत घट करणारी ही योजना आहे. केंद्र आणि राज्य शासनाने ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी केले.
या योजनेअंतर्गत पहिल्या जिवंत अपत्यासाठी तीन टप्प्यात एकूण पाच हजार रुपये मातेच्या बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये डिबीटीद्वारे जमा केले जातात. पहिल्या लाभासाठी गरोदरपणाची नोंद आरसीएच पोर्टलमध्ये एएनएम यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर 150 दिवसांच्या आत कोणत्याही शासकीय आरोग्य संस्थेत करणे बंधनकारक आहे. गरोदर मातेची नोंदणी केलेल्या माता आणि बालसंगोपन कार्डची झेरॉक्स, मातेचे आधार कार्ड, पतीचे आधार कार्ड आणि मातेचे बँक, पोस्ट खाते पासबूकची पहिल्या पानाची झेरॉक्स इत्यादी आवश्यक कागदपत्रे दिल्यानंतर पहिला लाभ जमा होईल.
दुसऱ्या हप्त्यासाठी गरोदर मातेचे सहा महिने पूर्ण झाल्यानंतर (180 दिवस ) आणि किमान एक प्रसूतीपूर्व गरोदर तपासणी करणे बंधनकारक आहे. गरोदर तपासणी केलेल्या माता बाल संगोपन कार्ड मधील गरोदर तपासणी पेजची झेरॉक्स दिल्यानंतर दुसरा लाभ जमा होईल. तिसऱ्या लाभासाठी प्रसूती नंतर बाळाचे प्राथमिक स्वरुपाचे लसीकरण पूर्ण केल्या नंतर (पेंटा-3) बाळाचे जन्म प्रमाणपत्र आणि लसीकरण पूर्ण केलेल्या माता बाल संगोपन कार्ड मधील पेजची झेरॉक्स दिल्यानंतर तिसरा लाभ जमा होईल. एकूण तीन टप्प्यात मातेच्या खात्यामध्ये पाच हजार रक्कम डिबिटी द्वारे जमा केली जाते. या तिनही लाभासाठी लाभार्थींच्या शेवटच्या मासिक पाळीच्या दिनांकापासून ते पुढे 730 दिवसात (दोन वर्षाच्या) आतच अर्ज दाखल करणे बंधनकारक आहे.
जिल्ह्यात दि.01 सप्टेंबर 2021 ते 07 सप्टेंबर 2021 या दरम्यान मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. जास्तीत जास्त पात्र गरोदर मातांना या योजनेच्या प्राप्त लाभाचा वापर आपल्या योग्य आहारासाठी करावा, जेणे करुन सदृढ आणि निरोगी बालक जन्माला येईल.
यावेळी स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉ.स्मिता गवळी, स्त्री रोग तज्ञ श्रीमती डॉ. मिटकरी, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक किरण गरड, जिल्हा सनियंत्रण व मुल्यमापन अधिकारी किशोर तांदळे, आरकेएस जिल्हा समन्वयक किशोर गवळी, आशा जिल्हा समन्वयक सतीश गिरी, पीएमएमव्हीवाय जिल्हा समन्वयक पौळ आणि रुग्णलयीन अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गवळी यांनी केले तसेच आभार सतीश गिरी यांनी मानले.
*महाराष्ट्र रिपोर्टर* चैनल ला लाइक शेयर *सब्सक्राइब* करा आणि आपल्या परिसरातील चालू घड़ामोड़ी पाहत रहा
बातमी व जाहिरात साठी संपर्क *मज़हरोद्दीन पटेल* संपादक * 9975640170
Mail :Laturreporter2012g@gmail. com
Web :www.laturreporter.in
**उस्मानाबाद * रिपोर्टर सय्यद महेबुब अली **
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.