महापौरांची आढावा बैठक स्वच्छता अॅबेटींग व धूर फवारणी संदर्भात निर्देश
लातूर/प्रतिनिधी: महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी आढावा बैठक घेऊन शहर स्वच्छता तसेच साथरोगांच्या पार्श्वभूमीवर धूर फवारणी आणि अॅबेटींग करण्यासंदर्भात संबंधित विभागांना निर्देश दिले.
पावसाळ्याच्या कालावधीत अस्वच्छता तसेच पाणी साठून राहिल्यामुळे साथरोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो.या पार्श्वभूमीवर महापौर विक्रांत गोजमगुंडे यांच्या अध्यक्षतेत मनपा मुख्यालयात आढावा बैठक संपन्न झाली.उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,सहाय्यक आयुक्त सौ.मंजुषा गुरमे, स्वच्छता विभाग प्रमुख श्री रमाकांत पिडगे व सर्व झोन चे प्रमुख स्वच्छता निरीक्षक यावेळी उपस्थित होते.
या बैठकीत मार्गदर्शन करताना महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी साथरोगांच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी दक्ष राहण्याचे निर्देश दिले. साथरोग पसरू नयेत यासाठी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.कचरा संकलन योग्य पद्धतीने होत आहे की नाही याची दक्षता घ्यावी.कचरा साठून राहू नये तसेच खुल्या जागेत पावसाचे पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव होऊ नये,याची काळजी घ्यावी.डासांची उत्पत्ती होऊ नये यासाठी अॅबेटींग केले जावे.धूर फवारणी करून डासोत्पत्ती थांबवावी,यासाठी स्वच्छता व आरोग्य विभागाने काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
या बैठकीत संबंधित विभागांकडून शहरात केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा आढावा सादर करण्यात आला.दररोज शहरात स्वच्छता केली जात असून डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अॅबेटींग, धूर फवारणी नियॅान फवारनी केली जात असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.या बैठकीस संबंधित विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.