लातूर शहरात 12 केंद्रावर 6 हजार 498 परिक्षार्थी परीक्षा देणार
§ सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट -ड पदभरती*
§ रविवार दि. 31 ऑक्टोबर, 2021 दुपारी 2 ते 4 वेळेत परीक्षा होणार
§ दिव्यांग उमेदवारांनी सोबत मुळ दिव्यांग प्रमाणपत्र ठेवणे
लातूर,दि.30 (जिमाका) :- शासनाच्या परवानगीनुसार गट - ड वर्ग- 4 ( 50 ) रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक 05 ऑगस्ट, 2021 रोजी जाहिरात प्रसिध्द केली होती. या बाबतची परिक्षा मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्यामार्फत रविवार, दिनांक 31 ऑक्टोबर, 2021 रोजी घेण्यात येणार आहे. लातुर शहरात भरती परिक्षा आयोजित करण्यात आलेली आहे. या परिक्षेसाठी 6 हजार 498 उमेदवार असुन त्यासाठी 12 केंद्रांवर दुपारी 2 ते 4 या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहे. या संवर्गातील कर्मचा-यांचे नियुक्ती प्राधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक लातुर हे आहेत. परीक्षा केंद्राचे नांव परिक्षार्थीची संख्या पुढील प्रमाणे आहे.
राजर्षी शाहू महाविद्यालय (स्वायत्त) चंद्र नगर लातूर - 1200, शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सरस्वती कॉलनी, जुना औसा रोड, लातूर- 792, दयानंद वाणिज्य महाविद्यालय बार्शी रोड, लातूर- 696, दयानंद कला महाविद्यालय, बार्शी रोड , लातूर-552, कॉकसेट कॉलेज अंबाजोगाई रोड लातूर कॉलेज ऑफ कॅाम्प्युटर सायन्स अॅन्ड आयटी कॉलेज, अंबाजोगाई रोड, लातूर-624, स्वामी विवेकानंद इंटिग्रेशन इंग्लिश स्कुल कळंब रोड, एमआयडीसी रोड, लातूर-504, देशीकेंद्र विद्यालय, सिग्नल कॅम्प, लातूर-576, श्री श्रीरविशंकर इंग्लिश प्रायमरी स्कुल, गोपाळ नगर,औसा रिंगरोड, लातूर-600, जिजामाता विद्यालय कळंब रोड, लातूर-240 , श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, न्यु बिल्डींग लातूर - 336 , श्री त्रिपुरा कनिष्ठ महाविद्यालय, अंबाजोगाई रोड, मेन बिल्डींग लातूर - 336, यशवंत विद्यालय, नांदेड रोड, विवेकानंद चौक, लातूर -600 असे एकूण 6 हजार 498 उमेदवार असुन त्यासाठी 12 केंद्रांवर दुपारी 2 ते 4 या वेळेत परीक्षा घेण्यात येणार आहेत.
कोवीड साथीच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास शंभर टक्के रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसरुन आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी मे. न्यासा कम्युनिकेशन प्रा.लि.यांची नेमणूक केली आहे.
परिक्षेसाठी बैठक व्यवस्था करत असताना
विचारात घेतलेले निकष
लातुर जिल्हयांतील रिक्त पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना लातुर शहरातील शाळा व महाविदयालयात आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. परिक्षार्थीना प्रवेश पत्र निर्गमीत करण्याचे कार्यवाही दिनांक 27 ऑक्टोबर, 2021 संध्याकाळी 6.00 वाजेपासुन सुरु झाले असुन ज्या उमेदवारांना प्रवेशपत्र मिळण्यास अडचणी येत आहेत त्यांच्या मदतीसाठी जिल्हा शल्य चिकित्सक लातुर कार्यालयात प्रवेशपत्र देण्यासाठी स्वतंत्र कक्ष चालु करण्यात आलेला आहे.
परिक्षा केंद्रावर आरोग्य विभागातर्फे शासनाचे प्रतिनिधी म्हणून पर्यवेक्षक व सहाय्यक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. परिक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्यासाठी मोबाईल जॅमर बसविण्यात आलेले आहे. दिव्यांग उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे लेखनीक उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. परंतू, दिव्यांग उमेदवारांनी सोबत मुळ दिव्यांग प्रमाणपत्र ठेवणे आवश्यक आहे. परिक्षार्थी उमेदवारांना प्रवेशपत्राबाबत कांही अडचण आल्यास परिक्षा केंद्रावर प्रवेशपत्राचे प्रिंट काढून देण्यात येईल. परिक्षा केंद्रावर पोलिस विभागातर्फे आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. कोविड-19 च्या अनुषंगाने परिक्षा केंद्रावर योग्य त्या उपाय योजना करण्यात आलेले आहे. भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना परिक्षेशी संबंधीत प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. न्यासा कंपनीचे समन्वयक केंद्रावर उपलब्ध आहेत. अडचणीच्या वेळेस खालील अधिकारी व कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा फोन नंबर खालील प्रमाणे आहेत.
न्यासा कंपनी प्रतिनिधी दिपक जक्कलवार मो. 7276265044 / आकाश येरेकर मो. 8999242155, डॉ. पाठक एस.जी. मो. 9422469640, मोरे पी. व्ही. मो. 8830108223 9423078574, जिल्हा शल्य चिकित्सककार्यालय - 02382-223160 यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
****
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.