विनापरवाना झोपेच्या व नशाकारक गोळ्या विक्री करणाऱ्या पानस्टॉल वर पोलिसांचा छापा. नशाकारक गोळ्यासह 21हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.*


*विनापरवाना झोपेच्या व नशाकारक गोळ्या विक्री करणाऱ्या पानस्टॉल वर पोलिसांचा छापा. नशाकारक गोळ्यासह 21हजार 350 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.*









लातूर रिपोर्टर न्यूज़ 

              या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे यांनी अवैध धंद्याची माहिती काढून त्यावर कारवाई करणे बाबत निर्देशित केले होते.

            त्या अनुषंगाने दिनांक 01/10/2021 रोजी अपर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात सदरचे पथक अवैध धंद्याची माहिती काढत असताना पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, दोन इसम त्यांचे पानपट्टी मधून अवैधरित्या,विनापरवाना झोपेच्या गोळ्यांची अवैधपणे विक्री करीत आहेत. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथकाने अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यासह औसा रोड वरील कश्मीर पानस्टॉल नावाच्या पानपट्टीवर छापा मारून पंचा समक्ष झडती घेतली असता सदर पानस्टॉल मध्ये Slepraz- 0.5 नावाच्या एकूण 600 गोळ्या आढळून आल्या. सदरच्या गोळ्या या झोपेसाठी वापरण्यात येतात. ते अन्न व औषध प्रशासनाच्या परवानगी/परवान्याशिवाय व डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विकता किंवा खरेदी करता येत नाहीत.असे असतानाही त्या पानपट्टी मधून सदरच्या गोळ्यांची विक्री होत असल्याचे आढळून आले.पानपट्टी मध्ये बसलेले दोन इसमाना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव-

1) जावेद रुकमोदिन शेख, वय 29 वर्ष ,

2) नसीर अल्लाउद्दीन शेख, वय 31 वर्ष,राहणार चांडेश्वर ता.जि. लातूर असल्याचे सांगून त्यांना सदरचे गोळ्या विकणे बाबतचा परवाना आहे का? असे विचारले असता त्यांनी सदरच्या गोळ्या विकण्याचा कसल्याही प्रकारचा परवाना त्यांच्याकडे नसल्याचे सांगितले. तसेच सदरचे गोळ्या कर्नाटक राज्यातील एका व्यक्तीकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.

            त्यावरून वर नमूद 2 इसम व सदरच्या गोळ्या पानपट्टी मधून विक्रीसाठी देणारा 1 इसम अशा तीन इसमा विरुद्ध पोलीस ठाणे,विवेकानंद चौक येथे पोलीस उपनिरीक्षक श्री.गळगट्टे यांचे फिर्याद वरून गुरक्र. 629/2021 कलम 276 328,336,34 भादवी. सह कलम 8(क), 21, 29 आमली औषधी द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1985, सह कलम 18(अ), 18(क) 27(अ), 27(ड) औषधे व सौंदर्यप्रसाधने कायदा 1940 व त्या अंतर्गत नियम 1945 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 नमूद गुन्ह्यात-

1) जावेद रुकमोदिन शेख, वय-29 वर्ष,

2) नसीर अल्लाउद्दीन शेख, वय 31 वर्ष, दोघे राहणार चांडेश्वर, तालुका जिल्हा लातूर यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील अवैध विक्रीसाठी आणलेल्या गोळ्या व मोबाईल असा एकूण 21 हजार 350 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील सपोनि श्री.खंदारे हे करीत असून गुन्ह्यातील अटक आरोपीना आज रोजी मा. न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

             सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अनुराग जैन यांचे मार्गदर्शनात व उपविभागीय पोलिस अधिकारी लातूर शहर श्री. जितेंद्र जगदाळे यांचे नेतृत्वात विशेष पथकातील पोलीस अंमलदार सफौ वाहिद शेख ,रामचंद्र ढगे, महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के तसेच अन्न व औषध विभागाचे पोलीस निरीक्षक श्री.सचिन बुगड, पोलीस स्टेशन विवेकानंद चे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगट्टे यांनी सहभाग नोंदविला .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या