खरीप हंगामासाठी 50 टक्के पीक विमा आगाऊ देण्याचा निर्णय

 खरीप हंगामासाठी 50 टक्के पीक विमा आगाऊ देण्याचा निर्णय





 औसा प्रतिनिधी

 प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीपासून शेती पिकाला सुरक्षाकवच मिळावे म्हणून पिक विमा योजना राबविण्यात येते. भारतीय कृषी विमा कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स, रिलायन्स जनरल इन्शुरन्स, भारती अॅक्सा जनरल इन्शुरन्स, बजाज आलियांज एचडीएफसी ईरगो इन्शुरन्स कंपनी अशा 6 विमा कंपन्या मार्फत ही योजना देशात राबविली जाते. भारतीय कृषी विमा कंपनी ही समन्वयक कंपनी म्हणून काम करते. 2021- 22 साला च्या खरीप हंगामासाठी सर्व कंपन्यांचा मिळून एकत्रित विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केली आहे. केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचना मधील मुद्दा क्रमांक 13 -1-6 नुसार चालू हंगामासाठी राज्य शासनाचा व केंद्र शासनाचा पिक विमा पोटी अग्रिम स्वरूपात पहिला हप्ता विमा कंपनीस अदा करणे आवश्यक आहे. त्यानुसार भारतीय कृषी विमा कंपनीने सादर केलेली मागणी, कृषी आयुक्तालयाची शिफारस या बाबीचा विचार करून दिनांक 29 सप्टेंबर 2021 च्या पत्रान्वये खरीप हंगाम 2021 अंतर्गत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदानाच्या स्वरूपात  प्रथम हप्त्यापोटी 973 कोटी 16 लाख 47 हजार 758 रुपये विमा कंपन्यांना अदा करण्यासाठी वितरित करण्याची शासनाची मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे खरीप हंगाम 2021- 22 सालासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के आगाऊ (अग्रीम) पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईपोटी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे,अशी माहिती नितीन शिंदे, अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांनी दिनांक 29 सप्टेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकां नूसार प्रसिद्ध केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या