डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी नगर पालिकेची डास निर्मूलनासाठी कसरत
औसा (प्रतिनिधी) अतिवृष्टीमुळे शहरामध्ये सर्वत्र घाण पसरली असून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डासाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे साथीचे रोग बळावले असून शहरात सध्या कावीळ, गॅस्ट्रो, चिकनगुनिया, मलेरिया आणि डेंगू सदृश्य रोगाचा प्रादुर्भाव मोठा पसरला आहे. परिणामी शहरातील अनेक नागरिकांना दवाखान्यात उपचार घेण्याची वेळ आली आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये सुद्धा लहान मुले, वृद्ध महिला तसेच अन्य नागरिक मोठ्या प्रमाणात उपचार घेत असून शहरात वाढत्या डासाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन औसा नगरपरिषदेने डास निर्मूलनासाठी आता कात टाकली आहे. डासाचा प्रारादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी नगरपालिकेने गल्लीबोळातील नालीवर जंतूनाशक फवारणी करून डासाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नगरपालिकेचे कसरत सुरू आहे. सततच्या पावसामुळे रस्त्यावर घाण साचत असल्यामुळे डासांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नगरपरिषदेने तातडीने दखल घेऊन धूर व औषध फवारणी आणि डास निर्मूलनासाठी नालीवर जंतूनाशक फवारणीचा उपक्रम हाती घेतला आहे. नगरपरिषदेचे नगराध्यक्ष डॉ अफसर शेख, स्वच्छता व आरोग्य सभापती मेहराज शेख आणि मुख्याधिकारी वसुधा फड यांनी आरोग्य व स्वच्छता विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना या कामी सूचना देऊन शहरातील डासांचे प्रमाण कमी कसल्याही प्रकारची टाळाटाळ करू नये अशा सूचना दिल्या.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.