अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतीचे पंचनामे न करता सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रु. ची मदत करा वंचित ची मागणी
औसा लातूर रिपोर्टर न्यूज़
चालू वर्षामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे आगाताचे पिक हातातोंडाशी आले असता निसर्गाचा कोप होवून अतिवृष्टी झाली व त्यात शेतकऱ्याचे आतोनात नुकसान झाले आहे. परंतू शासन या प्रश्नाची दखल गांभीर्याने न घेता काही मोजक्याच शेतकऱ्याचे नुकसाणीचे पंचनामे शेती बांधावर जाऊन करत आहे. परंतू या अतिवृष्टीमुळे संपूर्ण शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनामार्फत पंचनामे न करता सरसगट सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख - रु.ची मदत जाहिर करावी व त्या सोबतच शेतकऱ्याचे जे काही पदरात पडनारे सोयाबीन काढणीच्या वेळ आली असता नेमके याच वेळी केंद्रशासनाच्या चुकीच्या धोरणामुळे
सोयाबीनचे भाव गडगडले असल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे सोयाबीनच्या प्रती क्विटल 10000/- रु भाव देण्यात यावा.
तसेच औसा तालुक्यातील मौजे मातोळा येथील महिला शेतकरी नामे निर्मला शिवाजीराव भोसले यांच्या महावितरणच्या हालगर्जीपणामुळे शॉर्ट सर्किट होऊन 1 हेक्टर ऊस जळून खाक झाला आहे. तरी सदर महिला शेतकऱ्यास शासनामार्फत 250000/- रु नुकसान भरपाई देण्यात यावी.
या प्रमुख मागण्या त्वरीत मार्गी लावण्यात याव्या अशी औसा तालुका वंचीत बहुजन आघाडीची मागणी आहे. सदर मागण्या मान्य न झाल्यास पक्षाच्या वतीने तिवृ अंदोलन छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात नमूद केले आहे या वर महासचिव श्रावण कांबळे सुभाष भालेराव
अध्यक्ष शिवरुद्र गोपिनाथ बेरुळे तालुका अध्यक्ष औसा
एडवोकेट जयराज जाधव जि. उपाध्यक्ष) सतिश लिंबराज गायकवाड
कविर्य भगवर वाणा
दिगंबर टचढ़े
सूर्यकांत उबाळे
दयानंद लांडगे
महडिव हेतु साधन नु चोडशिम शिंदे कांबळे कैलास
इलीघास चौधरी
विनयकुमार
नागसेन गायकवाड
शेख अफताथ
किशन कोलते आदि चे हस्ताक्षर आहेत
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.