निद्रिस्त आघाडी सरकारला जागं करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठीआम्ही निघालो; :अभिमन्यु पवार

 आम्ही निघालो; निद्रिस्त आघाडी सरकारला जागं करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या व्यथेला वाचा फोडण्यासाठी...





औसा ते तुळजापूर पदयात्रेला काही वेळापूर्वी औसा येथून सुरुवात झाली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आघाडी सरकारनं वाळीत टाकलं आहे. आमचं दुर्दैव आहे की आमचे अश्रू पुसण्यासाठी मा मुख्यमंत्री, मा उपमुख्यमंत्री किंवा मा कृषीमंत्री यांना मराठवाड्यात येण्याची गरज सुद्धा वाटलेली नाही. एसी केबिनमध्ये बसलेल्या राज्याच्या प्रमुखांपर्यंत मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा पोहचवण्याचा प्रयत्न आहे. आमच्या मागण्याही खूप साध्या आहेत. २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर सांगलीला दिलेल्या मदतीच्या धर्तीवरच आम्हाला मदत द्या, मुजोर विमा कंपन्यांवर कारवाई करुन २०२० चा विमा आणि २०२१ चा २५% आगाऊ विमा मिळवून द्या, शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा आणि शेतजमीन खरडून गेलेल्या अल्पभूधारक व बहुभूधारक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लक्ष रुपयांची मदत द्या. आम्ही "मराठवाड्यातील शेतकऱ्यांची व्यथा पाहण्याची दृष्टी, २०१९ प्रमाणे नुकसानभरपाई देण्याची सद्बुद्धी आणि मुजोर पीकविमा कंपन्यांवर कारवाई करण्याचे धैर्य आघाडी सरकारला दे" असं साकडं आई तुळजाभवानी ला घालणार आहोत.


माजी खासदार डॉ सुनीलजी गायकवाड, भाजपचे स्थानिक लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व जातीधर्माचे लोकं, शेकडो शेतकरी बांधव या पदयात्रेत सहभागी झाले आहेत.

Devendra Fadnavis Chandrakant Patil BJP Maharashtra

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या