*प्राचार्य डॉ. मधुकर मुंडे यांचे दुःखद निधन*
प्राचार्य डाॅ़ मधुकर मुंडे यांचे निधन
लातूर : लातूरच्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चळवळीत अग्रभागी राहिलेले प्राचार्य डाॅ़ मधुकर मुंडे यांचे अल्पश: आजाराने बीड येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी मध्यरात्री दुःखद निधन झाले़ मृत्यसमयी त्यांचे वय ७२ वर्ष हाेते़. प्राचार्य डाॅ़ मधुकर मुंडे हे राजर्षी शाहू महाविद्यालयात राज्यशास्त्र विभागप्रमुख म्हणून अनेक वर्ष कार्यरत हाेते़ त्यानंतर ते पुणे विद्यापीठात विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक झाले़, याच विद्यापीठाच्या प्राैढ शिक्षण विभागाच्या संचालकपदाची धूराही त्यांनी सांभाळली हाेती़. सामाजिक चळवळीत नेहमीच पुढाकार घेणारे प्राचार्य डाॅ़ मुंडे पुणे येथून परत लातूरच्या डाॅ़ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात प्रचार्य म्हणून रजू झाले़, तेथे काही वर्ष सेवा केल्यानंतर रेणापूरच्या शिवाजी महाविद्यालयात प्राचार्यपदाची ही जबाबदारी त्यांनी स्वीकारली हाेती़. कळंब तालुक्यातील शिराढाेण येथील वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झाले़. मूळचे परळी तालुक्यातील सारडगाव येथील रहिवासी असलेले प्राचार्य डाॅ़ मुंडे यांची कर्मभूमी लातूर राहिली आहे़. त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या हमाल पंचायतीच्या चळवळीत ते सक्रीय हाेते़. देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या प्रश्नावरही त्यांनी लढा दिला़. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व आंदोलनातही ते सक्रिय होते. आता त्यांनी हमलाेग या संघटनेची स्थापना केली हाेती़ सातत रस्त्यावरच्या लढाईत अग्रेसर राहणाऱ्या प्राचार्य डाॅ़ मधुकर मुंडे यांची प्राणज्याेत मालवली़ मुंडे यांच्या पार्थिवावर बीड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़ त्यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, एक मुलगा, सून, नातू असा परिवार आहे़
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.