भाजपाची श्रेय घेणार्या काँग्रेसला चपराक
गंजगोलाई सुशोभिकरणाचे नवदुर्गांच्या हस्ते लोकार्पण
लातूर ः तत्कालीन पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून गंजगोलाईच्या शताब्दी वर्षपुर्तीनिमित्त गोलाईच्या सुशोभिकरणासाठी 3 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. यासाठी भाजपा मनपात सत्तेत असतांना सर्वसाधारण सभेमध्ये ठरावही घेतला होता. मात्र या सुशोभिकरणाचे लोकार्पण श्रेयासाठी भाजपाला डावलून करण्याचा घाट काँग्रेसने घातलेला होता. याला चपराक देत विजयादशमीच्या मुहूर्तावर भाजपाने नवदुर्गांच्या हस्ते गोलाई सुशोभिकरणाचे लोकार्पण केलेले आहे.
2017 साली झालेल्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा पुर्ण बहुमताने सत्तेत आली. याचवर्षी लातूर शहराची शान असणार्या गंजगोलाईच्या वास्तुला शंभर वर्ष पुर्ण होत होते. यानिमित्त महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपाने गोलाईच्या वास्तूचे सुशोभिकरण करण्याचा ठराव मंजुर करून त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी तत्कालीन पालकमंत्री आ.संभाजी पाटील निलंगेकर यांच्याकडे केली होती. आ.निलंगेकरांनी त्यावेळी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून याकरिता 3 कोटी रूपयांचा निधीही उपलब्ध करून दिला. आज त्याचे काम पुर्ण झाल्याने विजयादशमीचे औचित्य साधत काँग्रेसने भाजपला डावलत सुशोभिकरण कामाचे लोकार्पण पालकमंत्री अमीत देशमुख यांच्या हस्ते ठेवलेले होते. या कार्यक्रमासाठी खा.सुधाकर श्रृंगारे यांच्यासह भाजपाच्या कोणत्याही पदाधिकार्याला प्रत्यक्ष निमंत्रण दिले गेलेले नाही. केवळ आणि केवळ या कामाचे श्रेय लाटण्यासाठी काँग्रेसने हा घाट घातला होता मात्र भाजपाने याला मोठी चपराक दिलेली आहे.
भाजपाचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे यांच्या पुढाकारातून आज सकाळी नवदुर्गांच्या हस्ते मुख्य कमानीची फित कापत याचे लोकार्पण केले. यानंतर नवदुर्गांनी नारळ वाहत श्री जगदंबा देवीची महाआरती सुध्दा केली. यानंतर नवदुर्गांसह उपस्थित सर्व भाजपा नगरसेवक आणि पदाधिकार्यांनी गंजगोलाईच्या वास्तूस फेरी मारली. मग मनपाचे भाजपा गटनेते शैलेश गोजमगुंडे यांनी याठिकाणी उभारण्यात आलेल्या अधिकृत सभामंडपावर जावून याचे लोकार्पण झाले असे जाहीर केले. वास्तविक केवळ आणि केवळ श्रेय लाटण्यासाठी काँग्रेस भाजपाच्या सत्ता काळात मंजुर झालेल्या कामांचे लोकार्पण करत असून याला भाजपाला डावलले जात असल्याचे गोजमगुंडे यांनी सांगितले. राज्याच्या व मनपाच्या सत्तेत जेंव्हापासून काँग्रेस आलेली आहे तेंव्हापासून मनपाच्या माध्यमातून शहर विकासासाठी 1 रूपयांचाही निधी पालकमंत्री अमीत देशमुख यांनी मंजुर केलेला नाही. त्यामुळेच त्यांना भाजपाने मंजुर करून घेतलेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याचा कोणताही नैतीक अधिकार नसल्याचे गोजमगुंडे यांनी यावेळी सांगितले.
याप्रसंगी स्थायी सभापती दिपक मठपती, संघटन सरचिटणीस मनीष बंडेवार, यांच्या समवेत नगरसेविका भाग्यश्री कौळखेरे, ज्योती आवस्कर, रागिणी यादव, शोभा पाटील, श्वेता लोंढे, वर्षा कुलकर्णी, जान्हवी सुर्यवंशी, वैशाली स्वामी, वैशाली गिरी या भाजपाच्या नवदुर्गा तर परिवहन सभापती मंगेश बिराजदार, अजय दुडिले देवा साळुंके, संगीत रंदाळे, शैलेश स्वामी, व्यंकट वाघमारे, हनुमंत जाकते, खय्युम शेख, प्रविण घोरपडे, आदी नगरसेवक तर प्रविण सावंत, शिवसिंह सिसोदिया, महेश कौळखेरे, आनंद कोरे, मनोज सुर्यवंशी, देवा गडदे, मधुसुदन पारीख, ललित तोष्णिवाल, सतीश ठाकूर, ज्योतिराम चिवडे, महादेव कनगुले, कमलाकर डोके, किशोर जैन, संतोष तिवारी, संजय सुरवसे, शुभम् स्वामी, चंदु क्षिरसागर, नय्युम शेख, अजय पाटील, अजय भूमकर, सुरेश पंडीत आदी पदाधिकार्यांसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.