विलास साखर कारखाना युनीट १ व विलास साखर कारखाना युनीट २ चे दसरा (विजयादशमी) दिनी बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न

 

विलास साखर कारखाना युनीट १ व विलास साखर कारखाना युनीट २ चे

दसरा (विजयादशमी) दिनी बॉयलर अग्निप्रदिपन संपन्न







 

लातूर प्रतिनिधी : १५ ऑक्टोंबर :

  विलास साखर कारखाना युनीट १ व युनीट २ च्या गळीत हंगाम सन २१-२२ ची तयारी पूर्ण झाली आहे. कारखान्याचा गळीत हंगाम वेळेवर सुरू होणार असुन कारखाना कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे व्हा. चेअरमन रविंद्र काळे यांनी सर्व संचालक मंडळाच्या वतीने बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी सांगितले आहे.

   विलास सहकारी साखर कारखाना वैशालीनगर, निवळी युनीट नंबर १ व विलास साखर कारखाना युनीट २ तोडार ता. ऊदगीर येथील कारखाना गळीत हंगाम सन २१-२२ चे बॉयलर अग्निप्र‍िदपन सर्व संचालक आणि मान्यवरांच्या हस्ते दसरा (विजयादशमी) च्या मुहूर्तावर शुक्रवार दि. १५ आँक्टोबर २१ रोजी सकाळी संपन्न झाले.

  बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी शुभेच्छा देतांना व्हा. चेअरमन रविंद काळे म्हणाले, विलास साखर कारखाना युनीट १ व युनीट २ ची गळीत हंगामाची तयारी पूर्ण झाली आहे. सहकार महर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्याचे वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.अमित विलासराव देशमुख, आमदार धिरज विलासराव देशमुख व संस्थेच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाने आपण गळीत हंगाम सन २१-२२ वेळेवर सुरू करून यशस्वी करणार अहोत. हंगामात कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे वेळेवर गाळप करण्याचे नियोजनही करण्यात आले आहे, असे व्हा. चेअरमन रविंद्र काळे यांनी या प्रसंगी सांगितले.

  बॉयलर अग्निप्रदिपन प्रसंगी प्रस्ताविक करतांना कार्यकारी संचालक एस.आर.देसाई म्हणाले, गळीत हंगाम सन २०-२१ यशस्वीतेसाठी आवश्यक असणारी सर्व तांत्रिक कामे वेळेवर व चांगल्या पध्दतीने करण्यात आली आहेत. यासाठी लागणारी सर्व यंत्रणा भरली आहे. पूरक कामाचे नियोजनही पूर्ण झाले आहे. यामुळे गळीत हंगाम पूर्ण क्षमतेने वेळेवर सुरू होईल. सभासदाच्या ऊसाचे गाळप वेळेवर करण्यासाठी कारखाना जास्तीत जास्त क्षमतेने चालवीला जाईल. हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालत असतांना तांत्रिक कारणाने कारखाना बंद राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. गाळप झालेल्या ऊसापासून दर्जेदार साखर उत्पादीत केली जाईल असे सांगितले. कारखाना हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे योगदान महत्वाचे असते यासाठी सर्व अधिकरी, कर्मचारी, कामगार, तोडणी व वाहतुक यंत्रणा सर्व मिळून एकत्रीत योगदान देऊन हंगामात जास्तीत जास्त ऊसाचे गाळप करून हंगाम यशस्वी करूया असे आवाहन या प्रसंगी कार्यकारी संचालक देसाई यांनी केले.

  या कार्यक्रमास युनीट १ येथे व्हाईस चेअरमन रवींद्र काळे, माजी व्हाईस चेअरमन गोविंद बोराडेकार्यकारी संचालक एस.आर.देसाई संचालक सर्वश्री अनंत बारबोले, अनिल पाटील, गोविंद डुरे, सूर्यकांत सुडे, अमृत जाधव, सुभाष माने, संजय पाटील खंडापूरकर, तर युनीट २ तोडार येथील कार्यक्रमास राजेश्वर निटूरे, कार्यकारी संचालक ए.आर.पवार, संचालक सर्वश्री युवराज जाधव, भैरवनाथ सवासे, नारायण पाटील, बाळासाहेब बिडवे, रजित पाटील, भारत आदमाने, निमंत्रीत संचालक सिध्देश्वर पाटील, विजय निटूरे, मन्मथअप्पा किडे, राजेंद्र पाटील, मारोती पांडे, संतोष तिडके, विनोबा पाटील, पंडीत ढगे तसेच मंजूरखॉ पठाण, निलाप्पा बिराजदार, संदिप पाटील, बालाजी पाटील, अमोल घुमाडे, फैजूखां पठाण, इश्वर संमगे आदी उपस्थित यांची प्रमुख उपस्थिती होती.

  बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रमाच्या प्रारंभी विलास साखर कारखाना युनीट नंबर १ येथे महापूजा सर्व संचालकांच्या उपस्थितीत संचालक सुर्यकांत सुडे व सौ. शितल सुडे तर विलास साखर युनीट २ येथे संचालक नारायण पाटील व सौ.निषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. कोवीड१९ अनुषंगाने सर्व आरोग्य विषयक नियम पाळून बॉललर अग्निप्रदिपन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमास खाते प्रमुख, विभाग प्रमुख, सर्व कर्मचारी तसेच तोडणी-वाहतुक व पुरक कामाचे ठेकेदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहूल इंगळे यांनी केले.

-------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या