महावितरणचा पुन्हा शेतकऱ्याला झटका जवळगा येथे दोन एकर ऊस जळून खाक
औसा (प्रतिनिधी)दि.14 औसा तालुक्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभाराने कळस गाठला असून महावितरणच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात विद्युत पुरवठा व्यवस्था विस्कळीत झाली आहे. बुधवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी तालुक्यातील जवळगाव (पो) येथील निलेश मनोहर काकडे या शेतकऱ्याच्या सर्वे नंबर 276 मध्ये तीन एकर ऊस होता दिनांक 13 ऑक्टोबर रोजी शॉर्टसर्किट होऊन या शेतकऱ्याचा दोन एकर ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. औसा तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी मातोळा शिवारातील महिला शेतकऱ्याचा ऊस महावितरणच्या चुकीमुळे जळाला होता. औसा तालुक्यात महावितरणच्या विद्युत पुरवठा व्यवस्थेचा पूर्ण बोजवारा उडाला असून शेतकरी वर्गामध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याबाबत महावितरणचे अधिकारी कर्मचाऱ्यांना कधी जाग येणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मागील तीन आठवडे सततच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून नैसर्गिक आपत्ती मुळे हतबल झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस जळाल्यामुळे आता शेतकऱ्यावर पुन्हा आर्थिक संकट कोसळले असून अशा परिस्थितीमध्ये शेतकरी कसा करणार याबाबत तालुक्यात चर्चा सुरू आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.