होळी, तोंडोळी गावाचे पुनर्वसन करावे
-मा. संतोष सोमवंशी
औसा: मांजरा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने होळी व तोंडोळी गावात याचे पाणी शिरल्याने पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या गावातील कुंटुबा ना तातडीने सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
मागच्या पन्नास वर्षात असा पाऊस लातूर जिल्ह्यात प्रथमतः झाला असून याची नुकसानीची दाहकता अधिक आहे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजुन पुढे जास्त पाऊस आहे त्यामुळे पुढील अतिवृष्टीची उपाययोजना करणे गरजेचे आहे. अतिृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी शेतमजूर यांना आधार देणे गरजेचे आहे. पण गावात पाणी आल्यामुळे या दोन्ही गावाचे लोक मानसिक द्रष्ट्या खचलेले आहेत.या दोन्ही गावात फार मोठा धोका निर्माण झाला आहे.येणाऱ्या काळातील संकट टाळण्यासाठी या गावाचे पुनर्वसन करणे अंत्यत गरजेचे आहे. यासाठी आजच्या जिल्ह्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. अमितभैया देशमुख यांच्या कडे शिवसेना माजी जिल्हाप्रमुख तथा सदस्य जिल्हानियोजन समिती मा. संतोषभाऊ सोमवंशी यांनी मागणी केली आहे..
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.