ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीच्या वतीने औसा ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप
औसा प्रतिनिधी
आज दिनांक 19 आक्टोंबर 2021 मंगळवार रोजी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त. हजरत मोहम्मद पैगंबर यांनी जगाला मानवता, बंधुता,आणि शांतता संदेश दिला. त्यांचा संदेश अनुसरून आज
ईद-ए-मिलादुन्नबीच्या निमित्ताने आम आदमी पार्टीच्या वतीने काही तरी आमच्या हातून चांगले कार्य घडावे अशी भावना सर्व कार्यकर्तेच्या मनात धरून त्या भावनेचा विचार करून फुलं नाही फुलांची पाकळी म्हणून आम्ही आमच्या स्वखर्चातून ग्रामीण रुग्णालय औसा येथे रुग्णांना औशाचे आरोग्य अधिकारी डॉ रणदिवे,जाधव मॅडम यांच्या हस्ते शेफ,केळी,पेंडखजूर, बिस्किट पुडे, व पाण्याची बाॅटल अशी छोटीशी मदत म्हणून रुग्णांना वाटप करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा छोटासा फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले,औसा तालुकाध्यक्ष अॅड अनिल मोरे, शहराध्यक्ष अहेमद शेख,मिडीया प्रमुख एम बी मणियार, अॅड हिपरगकर, अॅड भुजबळ मॅडम, नितीन सुरवसे, अविनाश पाटील, समाधान माळी, सोहेल मणियार,मुज्जमील शेख, फारुख शेख,मुज्जमील मासुलदार,संजय पांडे,उपशहाराध्यक्ष अली कुरेशी, सय्यद अमीर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.