अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेत भाजप नेते गणेश हाके यांचा सहभाग

 अभिमन्यू पवार यांच्या पदयात्रेत भाजप नेते गणेश हाके यांचा सहभाग 





औसा प्रतिनिधी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकारने अत्यंत तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. या परिस्थितीमध्ये  शेतकरी नैसर्गिक संकटामुळे पूर्ण कोलमडला असून शेतीमालाच्या दरात  घसरण झाली आहे. तसेच शेतकऱ्यांची खरीप पिके पाण्यात नष्ट झाल्यामुळे शेतकरी कोलमडून पडला. त्यातच अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. नैसर्गिक संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी म्हणून विरोधी पक्षाचे नेते प्रयत्न करीत आहेत. महाविकास आघाडी सरकारला सद्बुद्धी यावी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी कुलस्वामिनी तुळजाभवानी ला साकडे घालण्यासाठी औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी औसा ते तुळजापूर पाई पदयात्रा काढली आहे. 72 तासाच्या या पदयात्रेत ते शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना धीर देत आहेत. या पदयात्रेला पाठिंबा दर्शविण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके यांनी दिनांक 17 अक्टोबर रोजी भेट दिली. पाटोदा ते ताकविकी पर्यंत गणेश दादा हाके या पदयात्रेमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत अमदपुर तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष प्रा हनुमंत देवकते, राम कांबळे, व इतर मान्यवर सहभागी झाले होते. यावेळी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांनी आमदार अभिमन्यू पवार आणि भाजप नेते गणेश दादा हाके यांचा सत्कार करून पाई पदयात्रेत विठ्ठल रुक्‍मिणी मंदिर समितीच्या वतीने शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या