साप्ताहिक आदर्श नेता वृत्तपत्राच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार
औसा :- साप्ताहिक आदर्श नेता वृत्तपत्राच्या वतीने कोरोना काळात महामारीने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते. हे संकट नष्ट करण्यासाठी कोरोना योद्धे अहोरात्र झटत आहेत आपल्या जीवावर उधार होऊन ते समाज कार्य करीत होते. अशा कार्यास एक कौतुकाची थाप व सामाजिक बांधिलकी म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्यात येणार आहे
यामध्ये सामाजिक राजकीय व वैद्यकीय क्षेत्रातील प्रशासनातील लोकांनी कोरोना काळात केलेल्या कार्याबद्दल तसेच जाफर पटेल युवा मंच व अफसर शेख युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळवार दिनांक 19 ऑक्टोंबर रोजी कटघर गल्ली येथे भव्य रक्तदान शिबिर रक्त तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबिर आयोजन करण्यात आलेले आहे
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष खा. ओमराजे निंबाळकर साहेब तसेच उद्घाटक म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर शेख साहेब.व अन्य प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत तरी औसा शहरातील नागरिकांनी जास्तीत जास्त शिबिराचा लाभ घ्यावा.असे आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.