एनसीबीच्याअधिकार्याने आर्यन खान याचे कधी काऊंसिलिंग केले त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे - नवाब मलिक
मुंबई दि. १८ ऑक्टोबर - इलेक्ट्रॉनिक पुरावे दाखवणार्या एनसीबीच्या अधिकार्याने कधी काऊंसिलिंग केले ते सांगावे आणि त्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आणावे असे थेट आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीला दिले आहे.
क्रुझवरील ड्रग्ज पार्टीत सापडलेल्या शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याचे एनसीबीने काऊंसिलिंग केले अशा बातम्या चालवल्या जात असल्याचे नवाब मलिक यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर नवाब मलिक यांनी संबंधित अधिकाऱ्याचा आपल्या शब्दात समाचार घेतला.
एनसीबी आर्यन खान याचे काऊंसिलिंग जेलमध्ये करायला गेले होते का? अशी विचारणा करतानाच देशातील मोठे वकील हरीश सालवे बोलत आहेत हा पब्लिसिटी स्टंट आहे.
त्यामुळे आता अशा पॉझिटिव्ह गोष्टींच्या बातम्या पेरल्या जात आहेत असाही थेट आरोप नवाब मलिक यांनी केला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.