बेकायदेशीर लॉज बंद करावेत - वेश्या व्यवसाय जोरात ; नगराध्यक्षांनी थेट केली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार

  शहरातील बेकायदेशीर लॉज बंद करावेत - नगराध्यक्ष डॉ अफसर 


>>> लॉजवर वेश्या व्यवसाय जोरात ; नगराध्यक्षांनी थेट केली तक्रार  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे 








एस ए काझी 


औसा प्रतिनिधी : - शहरातील अनेक लॉजवर बिनधास्तपणे वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती व चर्चा सध्या शहरातील परिसरात  सुरू असल्याने बेकायदेशीररित्या लाॅज मध्ये अवैध धंद्यां बरोबर इतर गैरकृत्य सुरु असुन या धंद्यामुळे शहराची शांतता भंग होत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीमध्ये  पोलिस यंत्रणा हे धंदे बंद करण्यास अपयशी ठरत असल्याचे दिसून आल्याने नगराध्यक्षांना लाॅज असलेल्या परिसरातील नागरिकांनी व लोकांनी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्याकडे तक्रार केली. त्या तक्रारीची दखल घेऊन थेट राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडेच केली आहे.

औसा शहरात विविध ठिकाणी आठ ते दहा लॉज आहेत. यामधील आनेक लॉजवर अवैध धंदे सुरु असल्याचा आरोप नगराध्यक्ष डॉ. शेख यांनी केला आहे. भरवस्तित कांही लॉज असुन त्यामध्ये देहविक्री करुन लॉजमालक आपले उखळ पांढरे करीत आहेत. औसा ही संतांची, सुफींची भुमी असुन तीला ऐतिहासीक वारसा आहे. नाथपिठ, केशव बालाजी मंदीर, भुईकोट किल्ला, विविध शैक्षणीक संस्था असल्याने लॉजवर चाललेल्या या बेकायदेशीर धंद्यांचा परिणाम शहराचे पावित्र्य व शांतता भंग करणारी आहे. कांही लॉज चालक हे आनेक जोडप्यांना रुम भाड्याने देत असल्याने औशात परजिल्ह्यातून जोडपे येत आहेत. तरुण मुलांच्या व शाळकरी मुलांच्या समोर हे धंदे सुरु असल्याने त्याचा अनिष्ठ परिणाम तरुण पिढीवर होत आहे. हे सर्व होत असतांना शहरातील पोलिस मात्र बघ्याची भुमिका घेत असल्याने हे धंदे फोफावत समाजात वेगळा संदेश जात असल्याने याविरोधात राष्ट्रवादीचे ग्रामिण जिल्हा कार्याध्यक्ष तथा नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख हे चांगलेच आक्रमक झाले असुन पालिकेकडून संबंधीत लॉज चालकांना या बाबत नोटीसा पाठविण्यात आल्या आहेत. या बाबत रितसर तक्रार त्यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे केली असुन या कामास अभय देणाऱ्यां विरोधात कारवाईची मागणी त्यांनी या तक्रारीत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या