आरोग्य केंद्र बेलकुंड कोवीड लसीकरण कार्यक्रम युद्धपातळीवर

 आरोग्य केंद्र  बेलकुंड कोवीड लसीकरण कार्यक्रम युद्धपातळीवर




covid-19 लसीकरण एक आणि दोन  कार्यक्रम प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड आणि उपकेंद्र बोरफळ  यांच्यावतीने लसीकरण कार्यक्रम बोरफळ येथील  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वैद्यकीय अधिकारी मा. डॉक्टर अमजद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. सदर कार्यक्रमास बोरफळ येथील नागरिकांचा प्रतिसाद मिळाला व सदर लसीकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिता वाघमारे, मुख्याध्यापक श्री शेख सर ,आरोग्य कर्मचारी बंडे जी.जी, बनकर,भांगे पी.जी,श्रीमती सुरेखा सुरवसे, ज्योती बोडके सहशिक्षक  गुरमे व्ही.डी व त्यांचे सर्व सहकारी तसेच गावातील ग्रामस्थ बुकाजी गिरेे, नागनाथ साळुंके यांनी परिश्रम घेतलेे. साळुंके माजीी उपसरपंच, माजी अध्यक्ष तंटामुक्ती समिती, माजी अध्यक्ष  शालेय समिती, सदस्य पांडुरंग देवस्थान बोरफळ अशा विविध पदावर साळुंके यांनी काम केले. सध्या त्यांच्याकडे वरील देवस्थानचे सदस्य पद आहे. सामाजिक कार्यायात, राष्ट्रीय कार्यात तसेच लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग असतो.सरपंच बालाजी गिरे यांंच्या मार्गदर्शनाखाली    काम करत असतात विशेष होय. आज संपन्न झालेल्या लसीकरण शिबिरात ज्येष्ठ पत्रकार विलास कुलकर्णी यांनीी नुकताच  covid-19 डोोस2 घेेेेतलाा.  प्राथमिक आरोग्य केंद्र बेलकुंड यांच्या वतीने   बोरफळ येथील आरोग्य उपकेंद्र अंतर्गत मागील सुमारे तीन महिन्यापासून प्रत्येक महिन्यात प्रत्येक आठवड्यात कार्यक्रम राबविण्यात येत आहेेत. यामुळे बेलकुंड आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यक्षेत्रात जनतेत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.  सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी आशा कार्यकर्ती  सिंधू सुरवसे, दीपा कंठेकर,  मंगल चव्हाण, द्रोपदी कांबळे,यांनीही परिश्रम घेतले.

                                           विलास कुलकर्णी                                                ज्येष्ठ पत्रकार औसा                                                9552197268

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या