सा.आदर्श नेता वृत्तपत्राच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार.

 सा.आदर्श नेता वृत्तपत्राच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार...

















औसा (प्रतिनिधी)मंगळवार दि.१९ ऑक्टोबर रोजी साप्ताहिक आदर्श नेता च्या वतीने कोरोना योद्धाचा सत्कार करण्यात आला.कोरोना काळात महामारीने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते.हे संकट नष्ट करण्यासाठी कोरोना योद्धा अहोरात्र झटत होते,आपल्या जीवावर उधार होऊन ते समाज कार्य करीत होते.अशा कार्यास एक कौतुकाची थाप व सामाजिक बांधिलकी म्हणून ईद-ए-मिलादुन्नबी च्या निमित्ताने कोरोना योद्धाचा

सत्कार उस्मानाबाद चे खासदार ओम राजे निम्बालकर व नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख यांच्या हस्ते करण्यात आले.सकाळी 11:30 वाजता मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित सन्मानचिन्ह व स्मरणपत्र देऊन सम्मानित करण्यात आले.साप्ताहिक आदर्श नेता वृत्तपत्राच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून औसाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,सुरेश अप्पा ठेसे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.आर.आर. शेख,रेवणसिद्ध भागुडे,सतीश नाईक, मुजाहिद शेख,डॉ.यूनुस पटेल,महमुद शेख,डॉ.एजाज शेख, सा. लातूर रिपोर्टर चे संपादक मजहर पटेल,बासिद शेख,नागनाथ भुरे आधिन हालीघोंगडे,शेख फकिरपाशा,मुदसिर शेख,वसंत बनसोडे,कृष्णा शिंदे आदीना सन्मानित करण्यात आले.यावेळी जाफर पटेल युवा मंच व अफसर शेख युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर,रक्त तपासणी शिबीर व नेत्र तपासणी शिबीर आयोजीत करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा अध्यक्ष खा.ओमराजे निंबाळकर  तसेच उद्घाटक म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ.अफसर शेख,प्रमुख पाहुणे कांग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष शकील शेख,प्रभारी नगराध्यक्षा किर्ती ताई कांबळे,नगरसेवक जावेद शेख,भरत सूर्यवंशी,मेहराज शेख, गोविंद जाधव,एम.आई.एम.तालूका प्रभारी अफसर शेख,मोहसिन पटेल,सय्यद खादर,पाशा शेख, मुजाहेद शेख उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सा. आदर्श नेताचे संपादक जाफर पटेल यांनी मांडले तर आभार वकील इनामदार यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या