पैगंबर जयंतीनिमित्ताने एमआयएम पक्षाच्यावतीने मदत..
एस ए काझी
पैगंबर जयंतीनिमित्ताने एमआयएम पक्षाच्यावतीने मदत..
औसा /प्रतिनिधी : - शहरात मंगळवार दि. 19 रोजी मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शहरात विविध भागांत गरीबांना अन्नदान, रक्तदान असे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. मुस्लिम समाजबांधवानी एकमेकांना ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त शुभेच्छा दिल्या.
शहरातील मशिदींमध्ये नमाज अदा करून सण उत्साहात साजरा करण्यात आला. मिलादुन्नबी सणानिमित्ताने घरोघरी छोट्याखानी कार्यक्रम घेण्यात झाले. औसा एमआयएम च्या वतीने शहरातील शासकीय रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला शासकीय ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. यावेळी औसा एमआयएमचे तालुका प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार, ॲड. गफरुल्ला हाश्मी, अलीम शेख, मुशीर शेख, अजहर कुरेशी, अफसर शेख, कलीम शेख, मौला शेख, माजीद पटवेकर यांच्या सह तालुका आरोग्य अधिकारी डॉ आर आर शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंगद जाधव, डॉ मुजाहिद शरीफ, डाॅ. रणदिवे, यांच्यासह एमआयएम पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सोशल मिडीयावरदेखील दिवसभर एकमेकांना ईद-ए-मिलादुन्नबीच्या शुभेच्छा देणारे संदेश पाठविण्यात आले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.