आदर्श मैत्री फाउंडेशन च्या दिपवाली उपक्रमात पेपर रद्दी व नविन साड्या देऊन सहभाग नोंदवा
लातुर - आदर्श मैत्री फाउंडेशन नेहमी समाज उपयोगी उपक्रम राबवत असते त्यातलाच एक भाग म्हणून दरवर्षी प्रमाणे या वर्षीही दिपवाली गरजू- अनाथ, गोर-गरीबा सोबत साजरी करण्यासाठी त्यांना दिपावली फराळ, अभ्यंगस्नान किट व साड्यांचे वाटप करन्यात् येणार आहे .
शहरात अनेक वस्त्या अशा आहेत तेथे त्यांना राहायला घर नाही, लेवण्यासाठी कपडे नाहीत, हाताला काम नाही अशा परिस्थितीत दिपवाली सारखा सण साजरा करणे त्यांना अशक्य आहे, अशा वंचित-गरजू कुटुंबा सोबत दिपवाली गोड करण्यासाठी आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने त्यांना दिपावली फराळ, अभ्यंगस्नान कीट व साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी लातूर शहरातील सुजाण नागरिकांनी आपल्या घरातील पेपरची रद्दी व नवीन साड्या आम्हास दान कराव्यात, संकलित झालेली पेपर रद्दी विक्री करून त्यातून जमा झालेल्या निधि मधून फराळ व अभ्यंगस्नान किट वाटप करण्यात येणार आहे तरी पेपर रद्दी व साड्या आदर्श मैत्री फाउंडेशनच्या कार्यालय मध्ये किंवा घरून घेऊन जाण्यासाठी आदर्श मैत्रीच्या मोबाईल नंबर: 9168222333 क्रमांकावर दिनांक 1 नोव्हेंबर पूर्वी संपर्क साधावा असे आव्हान आदर्श मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बिराजदार, संचालक प्रा शिवराज मोटेगावकर ,तुकाराम पाटील, शशिकांत पाटील, सचिदानंद ढगे पाटील, ऍड दासराव शिरुरे, डी. एस. पाटील, निलेश राजमाने, विवेक सौताडेकर, मोहन सिरसाट, शिवाजी हांडे, राघवेन्द्र इटकर, पद्माकर वाघमारे, औरादे अरविंद,आसिफ शेख ,प्रवीण सूर्यवंशी,चंद्रशेखर गिरी, अतुल कोचेटा, राजेश मित्तल, प्रमोद भोयरेकर,कल्पना फरकाडे आदींनी केले आहे.
आदर्श मैत्री फौंडेशनची माणुसकीची दीपावली
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.