*सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत, एस. टी. कामगारांचा पगार आणि पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का? डॉ. राजन माकणीकर*
*मुंबई दि (प्रतिनिधी) सरकारकडे आमदार खासदारांचा पगार वाढवण्यासाठी पैसे आहेत, एस. टी. कर्मचार्यांचा पगार आणि पोलिसांचा बोनस देण्यासाठी तिजोरीत खडखडाट का? असा सवाल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी केला आहे.*
विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर पुढे म्हणाले की, पोलीस यंत्रणा ही राज्याचे सुरक्षा कवच असून यांच्यामुळेच समाज निर्धास्त असतो, दोन्ही क्षेत्रात गरीब आणि शेतकरी पुत्र कामाला असून दिवस रात्र जीवाची पर्वा न करता आपली सेवा देतात.
कोणत्याही आपत्तीत पोलीस यंत्रणा ही आपला जीव हातात घेऊन चोवीस तास सेवा देत असतात, वृद्धापकाळात अनेक रोगांमुळे ते ग्रासलेले असतात यामुळे यांना किमान मोबदला देणे महत्वाचं वाटते.
सत्ताधाऱ्यांनी आपला 1 महिण्याचा पगार कपात करून पोलिसांना बोनस व भरपगारी वेतन देऊन त्यांचा दीपावली कपात सन्मान करावा तसेच एस टी कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुद्धा सरकारने सकारात्मक विचार करावा अन्यथा पक्षप्रमुख कनिष्क कांबळे यांच्या नेतृत्वात संबंध महाराष्ट्रात आंदोलन करू. असा इशाराही पँथर राजन माकणीकर यांनी दिला.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.