मुस्लिमांच्या समस्या संघटन शिवाय सुटु शकत नाहीत"अब्दुल सत्तार इनामदार.

 "मुस्लिमांच्या समस्या संघटन शिवाय सुटु शकत नाहीत"अब्दुल सत्तार इनामदार.









शेख बी जी.


औसा.दि.२६ मुस्लिम समाजाच्या समस्या मुस्लिम समाज एकत्रित आल्याशिवाय सटु शकत नाहीत. त्यांना एकत्रित आणण्यासाठी संघटनची गरज आहे. व हे संघटन मुस्लीम विकास परिषदेने यापूर्वी करून दाखवले आहे. मुस्लीम विकास परिषदेच्या मागण्यां मुळेच आज अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत आहे. भविष्यात मुस्लिमांना आरक्षण हवे असेल तर त्यांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अब्दुल सत्तार इनामदार यांनी औसा येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या बैठकीत म्हटले आहे. या बैठकीला औसा शहरातील काँग्रेस शहराध्यक्ष शकील शेख तर मुस्लीम विकास परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष उस्मान शेख उपस्थित होते.

या बैठकीत प्रथमतः औसा काँग्रेस कमिटीच्या वतीने अब्दुल सत्तार ईनामदार यांचा सत्कार करण्यात आला.त्यानंतर मुस्लीम विकास परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी औसा नगरीची माजी उपनगराध्यक्ष शेख फहीम यांची निवड करून त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.तर शहराध्यक्ष म्हणून डॉक्टर मकबूल शेख यांची निवड करण्यात आली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मुस्लिमांना आरक्षण दिले होते.परत त्याच पक्षांची सत्ता महाराष्ट्रात आहे.त्यांनी आमची पूर्वीचे आरक्षण कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करावे असे प्रतिपादन माजी जिल्हाध्यक्ष उस्मान शेख यांनी केले.

कार्यक्रमाला मुस्लिम विकास परिषदेचे कार्यकर्ते मंन्सुर रुईकर, गुलाब शेख,आदम देशमुख,तूराब पठाण, जावेद पठाण, शेख बी जी, यांच्याबरोबरच काँग्रेस कार्यकर्ते हमीद भाई शेख वहीद कुरेशी, हाजी शेख, पत्रकार इलियास चौधरी, आसीफ पटेल आदी उपस्थित होते. आभार काँग्रेस शहराध्यक्ष शकील भाई शेख यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या