उजनी मोडवर अतिक्रमण मुळे अपघाताचे प्रमाण वाढले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा

 उजनी मोडवर अतिक्रमण मुळे अपघाताचे प्रमाण वाढले. 

"""""""""

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हलगर्जीपणा 

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

बस स्थानक नसल्याने हाॅटेल समोर थांबतात एस टी बस : प्रवाशांना व विद्यार्थी. कर्मचाऱ्यांना रोज 1 किलो मीटर पायपीट करावी लागते 

"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या हलगर्जीपणामुळे घडला अपघात








उजनी हे गाव लातूर व उस्मानाबाद जिल्हा सीमेवर आहे .उजनी मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते येथे शासकीय व निमशासकीय कार्यालय मोठ्या प्रमाणात आहेत येथे खरेदी विक्रीसाठी परिसरातील कमालपूर .धुता. मासुरङी.बिरवली.काकासपूर. भंडारी. तांडा. एकंबी. वाडी. अशीव. चिंचोली. टाका. वांगजी. तावशी नागरिक येतात 

उजनी हे गाव औसा-तुळजापूर महामार्गावर आहे येथील बासुंदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे त्यामुळे या रोडवरून धावणाऱ्या सुपर एक्स्प्रेस एस टी बस बासुंदी स्वाद घेण्यासाठी व  जेवण करण्यासाठी येथील हॉटेल समोर थांबतात प्रत्येक चालकाला व वाहकाला मोफत जेवण दिले जाते व चालकाला 200 रुपये भत्ता दिला जातो. या लालची पोटी बस चालक रोंग साईडने गाडी घालतात व समोरून येणाऱ्या प्रवाशांचा जीव घेतात असाच प्रकार दि.25 रोजी दुपारी 2 वाजता उजनी मोड येथे घडला कर्नाटक आगाराची बस के ए 28 f 2454 ही गाडी चुकीच्या दिशेने आली व आपल्या साईड ने जात चुकीच्या दिशेने आली व सरळ चाललेल्या दुचाकीला धडक दिली यात भातगळी येथील ज्ञानेश्वर जगताप व हनुमंत जगताप पितापुत्र जागीच ठार झाले असून त्यांना बस चालकाच्या चुकी मुळे आपला जीव गमवावा लागला आहे .

उजनी हे गाव औसा-तुळजापूर महामार्गावर आहे येथील हॉटेल चालकांनी रस्त्याच्या कडेला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत हॉटेल  चालकांनी नावचे मोठा मोठे बोर्ड उभे केले आहेत अतिक्रमण केले आहे त्यामूळे येणार्‍या जाणार्‍या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

तसेच उजनी मोड बस स्थानक नसल्यामुळे येथील हॉटेलवर थांबणार्‍या बस कडे  प्रवाशांना विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांना 1 किलोमीटर पायी प्रवास करावा लागत आहे 

येथे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे बस  स्थानक आहे पण त्यांच्या  चुकीमुळे ते उजनी मोड पासून 1 किलोमीटर तेरणा नदी काठ जवळ बांधले आहे या बस स्थानकाचा लाभ प्रवाशांना होत नसून टवाळखोर दारू पिणाऱ्या नागरिकांसाठी होत आहे 

उजनी मोड येथे उड्डाणपुलाच्या अवतीभवती मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची जागा आहे तेथे बस स्थानक होणे गरजचे आहे 

मात्र उड्डाणपुलाच्या अवतीभवती असणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या जागेत सध्या अनेक नागरिकांनी अतिक्रमण केले आहे .

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाने या जमिनीचा व जागेचा मोबदला त्यांना दिला आहे तरीही येथील नागरिकांनी अतिक्रमण केले आहे व जागेवर मोठ मोठे दुकाने थाटली आहेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या या हलगर्जीपणामुळे येथे अतिक्रमण वाढले आहे व त्यांनी चुकीच्या ठिकाणी बस स्थानक केल्यामुळे प्रवाशाचे हाल होत आहेत तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाने उजनी मोड येथे उड्डाणपुलाच्या अवतीभवती दोन्ही बाजूने अतिक्रमण काढून तेथे दोन्ही  बाजूने बस स्थानक करणे गरजचे आहे व उजनी मोड वरील हॉटेल चालकांनी रस्तेच्या कडेला लावलेले बोर्ड काढणे गरजेचे आहे तरच अपघाताला आळा बसेल असे बोलले जात आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या