जिल्हा बँक आणि साखर कारखान्याचा पै-पै हिशोब होणार
महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी
भाजपा कार्यकर्त्यांनी संकल्प करावा
लोकप्रतिनिधी व पक्ष पदाधिकारी बैठकीत भाजपा नेते किरीट सोमय्या
देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भ्रष्टाचार मुक्त भारत निर्माण करण्याची शपथ घेतली असून भाजपा कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी संकल्प करावा असे आवाहन करून लातूर जिल्हयातील सहकारी साखर कारखान्या बरोबरच जिल्हा बँकेतील कारभाराचा एक एक पैशाचा हिशोब केला जाणार असून जे गुन्हेगार असतील त्यांच्यावर निश्चितच कार्यवाही होईल असे भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी बोलून दाखविले.
लातूर जिल्हयातील भाजपाच्या पक्ष पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात बुधवारी झाली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे जिल्हाध्यक्ष रमेशअप्पा कराड हे होते तर माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यु पवार, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, किसान मोर्चाचे दिलीपराव देशमुख, जिप अध्यक्ष राहूल केंद्रे, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, शैलेश लाहोटी, संजय दोरवे, शैलेश गोजमगुंडे, बापुराव राठोड, संतोषअप्पा मुक्ता, अॅड. जयश्री पाटील, प्रेरणा होनराव, सुधीर धुत्तेकर, गोविंद चिलकुरे, रोहीदास वाघमारे, मनिष बंडेवार, साहेबराव मुळे, स्वाती जाधव, श्रृध्दा जगताप, अजित पाटील कव्हेकर, दिग्वीजय काथवटे, अमोल पाटील, विक्रम शिंदे, पंडीत सुर्यवंशी यांच्यासह जिल्हाभरातील लोकप्रतिनिधी, पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते. यावेळी जिल्हयातील विविध प्रकरणाचे दस्तावेज किरीट सोमय्या यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
प्रारंभी लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने किरीट सोमय्या यांचे संत ज्ञानेश्वर माऊलीची मुर्ती भेट देवून स्वागत करण्यात आले. जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे यांनी बैठकीचे प्रास्ताविक करून संचलन केले तर शेवटी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.