पोलीस ठाणे, अहमदपूर येथे दाखल बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीस 05 वर्ष सक्तमजुरीची शिक्षा व 25,000/_ रुपयाचा दंड.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 21/12/ 2020 रोजी पोलीस स्टेशन अहमदपूर येथे पीडित मुलीच्या नातेवाईकाने तक्रार दिली की, नमूद गुन्ह्यातील आरोपी नामे विनोद नारायण घोटकेकर वय- 25 वर्ष, याने गुन्ह्यातील पीडित मुलीस वाईट हेतूने ओढून घेऊन जात असताना मुलीने आरडाओरडा केल्याने पीडित मुलीस मारहाण करून वाईट उद्देशाने पीडित मुलीचे शरीरास झोंबाझोंबी करून पळून गेला.वगैरे फिर्याद वरून पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 402/2020 कलम 354, 363, 511 भा. द.वि. सह कलम 7 व 8 बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे,तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री.हिंमत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी (अहमदपूर) श्री.बलराज लंजीले तत्कालीन पोलीस निरीक्षक श्री. सुनीलकुमार बिर्ला यांचे मार्गदर्शनात तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक श्री.विजय पाटील यांनी गुन्ह्याचा बारकाईने तपास करून साक्षीदाराकडे सखोल विचारपूस करून आरोपी विरुद्ध भरपूर सबळ व भौतिक पुरावे गोळा करून मा.कोर्टात नमूद आरोपीविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले.
सदर दोषारोपत्रा मध्ये आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे असल्याने मा. न्यायालयाने आरोपी नामे
विनोद नारायण घोटकेकर, वय-25 वर्ष यास त्याने केलेल्या कृत्याची शिक्षा म्हणून 05 वर्ष सक्तमजुरी शिक्षा व 25,000/_ हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.
नमूद गुन्हा दाखल झाल्यावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात तत्कालीन तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक श्री.विजय पाटील यांनी गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून आरोपीस शिक्षा घडवून आणली. तसेच त्यांना तपासकामी पोलीस स्टेशन अहमदपूरचे पोलीस अमलदार कैलास चौधरी, संतोष गोडाम, महिला पोलीस अंमलदार श्रीदेवी पटवेकर यांनी मदत केली.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.