माझं लातूरच्या वतीने 5 डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया आणि नेत्रतपासणी शिबीराचे आयोजनv

 

माझं लातूरच्या वतीने 5 डिसेंबर रोजी मोफत मोतीबिंदू निदान, शस्त्रक्रिया आणि नेत्रतपासणी शिबीराचे आयोजन






लातूर दि.1 - माझं लातूर परिवार आणि विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने येत्या 5 डिसेंबर 2021 रोजी भव्य अशा मोफत नेत्रतपासणी, मोफत मोतीबिंदू निदान आणि शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
येशील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील नेत्र विभागात ओपीडी क्र.4 याठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 यावेळेत हे शिबीर संपन्न होणार आहे.
माझं लातूर परिवाराचे हे दुसरे नेत्र शिबीर असून 5 सप्टेंबर रोजी झालेल्या पहिल्या शिबिरात 42 रुग्णांवर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्र विभागात यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाल्या आहेत. अधिष्ठाता डॉ सुधीर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्र विभाग प्रमुख डॉ उदय मोहिते, डॉ. डोळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ संतोष डोपे यांच्यासह नेत्र विभागातील सर्व डॉक्टर शिबिराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नरत आहेत.
शिबिरात सहभागी होण्यासाठी गरजू रुग्णांनी 9923001824, 9822223422, 9270831750, 7722075999, 9404584593, 9156071071, 9422612245, 9860200014, 9422015925, 9422071717, 9422626747 या नंबरवर फोन करून नोंदणी करावी.
नोंदणी केलेल्या रुग्णांचीच तपासणी या शिबिरात होणार असून इतर लोकांनी गर्दी करू नये तसेच शिबिरात येताना मास्क आणि सॅनिटायझर  याचा उपयोग करून योग्य अंतर पाळावे. येताना आधार कार्ड सोबत घेऊन यावे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त नेत्र रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन माझं लातूर परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या