एक सच्चा व निस्वार्थ मनाचा समाजसेवक-फहादभाई अरब
एक गोष्ट सांगितली जाते ना की, माणसाला त्याचे कर्म हे मोठे बनवत असतात. पैसा, प्रसिध्दी, सुख तथा समाधान हे तर कर्मानुसार कार्यानूसार, मेहनती नुसार आणि माणूसकीच्या मोठेपणा नूसार आपोआप आपल्या जवळ येत असतात. त्याचप्रमाणे जिवन जगताना माणसांच्या या गर्दीत अनेक प्रकारचे चेहरे भेटतात त्यात कांहीसे आपलेसे करणारे असतात, त्यांच्या खुशमिजाज, आपुलकी दर्शक स्वभावाने आपूसक कांही जवळ जात असतात, अशाच व्यक्तीमत्वापैकी एक गुणी व आदर्श समाजसेवक, मुसद्दी राजकारणी, उच्चशिक्षित, दिलखुलास, सतत हसमुख, युवा नेतृत्व म्हणजे आमचे बंधुमित्र मा फहादभाई अरब होय. प्रसिध्दी च्या झोतापासून दूर राहून कोणत्याही कार्याचा उहापोहा न करता गरजवंताना सढळ हाताने मदत करुन त्याचं आशिर्वाद,दुवा आपल्या झोळीत टाकून घ्यायचं प्रामाणिक प्रयत्न नेहमी फहादभाई करीत असतात म्हणून तर फहादभाईची ओळख एक सामाजिक कार्यशैलीवर गरजवंताना नेहमी मदत करणारा अवलिया आणि राजकीय पटलावर पडद्याआड भुमिकेत रहाणारा एक चाणक्य अशी आहे. त्यात वरुन कधीही श्रीमंतीचा गर्व न करता उच्च विचारसरणीने प्रत्येकाला आपूलकीने, गोडीने, हसमुख स्वभावाने प्रत्येकाच्या मनात उतरायचं काम नेहमी फहादभाईचं असतं.
फहादभाई आणि आमच्या परीवाराचा तीन पिढयांचा कौटुंबिक संबंध फहादभाईचे आजोबा पै. फैजूमास्तर नागरसोगा आणि आमचे आजोबा पै अजमोद्यीन पटवारी हरेगाव हे चांगले मित्र व गावशेजारी. तद्नंतर वडील तालुक्यातील नावाजलेले डॉ.अरब असलमसहाब व आमचे वडील शेख रसूलसाब गुरुजी हे महाविद्यालयीन वर्ग मित्र, दोघांच्याही घरच्यांचा जिव्हाळ्याचा संबंध.
फहादभाई हे माझे शालेय जिवनातील सिनिअर व आमचे बंधू आसेफ शेख यांचे वर्गमित्र.फहादभाई आणि आसेफभाई यांच्यात घनिष्ठ मैत्री व त्यांच्या सोबतीला पै.तत्तापुरे नियामत, मिलिंद गुणाजी, मणियार नियामत, अमीत लांडे असा मित्र परीवार हे सर्व मित्र अभ्यासातही हुशार आणि भ्रमंती करायला कोठेही तयार.त्यांचा फिरण्याचा सहलीला जाण्याचा छंद आज ही फहादभाईंनी जोपासला असून नेहमी ते भ्रमंती करीत रहातात. तसेच आमचे मोठे बंधू डॉ.रहिमोद्दीन शेख हे डॉ.अरब साहेबांचे खास,मोठया मुला प्रमाणे डॉ.साहेब बंधूस मानत. ज्यावेळेस अरब साहेब हज ला गेले होते त्यावेळेस दोन महिने डॉ. रहिम भैय्यानी डॉ.साहेबांची ओपीडी संभाळली होती, त्यावेळेस खेडया-पाडयातून येणारे लोक असे म्हणायचे की डॉ.अरब साहेबांचे चिरंजीव दवाखाना संभाळत आहेत. डॉ. साहेबांसारखाच हातगुण आहे.असो सांगायचं तात्पर्य एवढंच की डॉ.अरब साहेबांनी कधीच श्रीमंतीचा गर्व केला नाही फक्त माणसं जोडायचं आणि सर्वांना आपुलकीने वागणूक द्यायची. याचाच प्रत्यय आज फहादभाई मध्ये बघायला मिळतो.
फहादभाईंना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी सामाजिक भावना जोपासून मजहर पटेल यांच्या खिदमत-ए खल्क शी नाळ जोडून नेहमी गरजवंताना मदत करुन सामाजिक भान जपतात. गरजवंताना वेळो-वेळी साथ देवून त्यांना मदत करुन त्यांच्या जिवनात आनंद व जगण्याची उम्मीद द्यायचं एक प्रामाणिक प्रयत्न तसेच प्रत्येकाच्या सुख-दुःखात हजर राहून सदैव मदतीस तयार असतात. फहादभैय्यांनी नेहमी सकारात्मक बाबीतून सामाजिक माध्यमातून आपल्या कर्तृत्वाने झेप घेवून औद्योगिक तथा राजकीय क्षेत्रात आपल्या स्वकर्तृत्वाने नावलौकीक मिळविलेलं आहे. राजकारणात आज ते मोठ्या पदावर ही राहिले असते. स्नेही डॉ.अफसर शेख यांच्या खांद्याला खांदा लावून ते काम करतात. परंतू कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता आज ते राष्ट्रवादीत महत्त्वाचे घटक असून पडद्यामागून राष्ट्रवादीचे चाणक्य आहेत.
फहादभैय्या हे राजकारणाच्या पदापासून लांब राहून नेहमी सामाजिक भावना जोपासून गरवंताना मदत करण्यास कधीही मागे सरकत नसून पडद्याआड राहून समाजकार्य निभावतात आज २१ नोव्हेंबर, फहादभाईंचा वाढदिवस त्यानिमित्ताने मी अल्लाह तआला जवळ दुवा करतो की त्यांना निरोगी आरोग्य लाभो, समाजकार्यात असच नेहमीसारखं तत्पर रहावं, त्यांच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होवो. आखीर अल्लाह तआला से यहीं दुवा करते हैं की अल्लाह आपको लंबी उम्र सेहत, शौहरत और बुलंदी से नवाजे.. आमीन!
व्यक्ति विशेष-
ऍड.इकबाल रसूलसाब शेख
औसा /Mo. 9545253786
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.