*शांतता ठेवण्याचे लातूर पोलीस अधीक्षकांचे आवाहन, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्यास होणार कठोर कारवाई.*
लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो
या बाबत थोडक्यात हकीकत अशी की, गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून "लातूर बंद, रस्ता रोको" मोर्चा वगैरे स्वरूपाचे मेसेज व्हायरल केले जात आहेत. तसेच राज्यात काही जिल्ह्याच्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने लातूर पोलिस सतर्क झाले असून पुरेपूर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.
नागरिकांनी संयम ठेवून शांतता राखावी.अफवांवर विश्वास ठेवू नये.दोन समाजामध्ये तेड निर्माण होईल किंवा सामाजिक शांती सलोखा बिघडेल असे कृत्य करू नये.असे आवाहन लातूर पोलिसांकडून केले जात आहे.
जो कोणी कायदा व सुव्यवस्था बिघडेल किंवा तसे कृत्य करेल,लातूर बंद,रस्ता रोको करण्याचा प्रयत्न करेल किंवा तसे मेसेजेस वायरल करेल अशा लोकांच्या विरोधात दखलपात्र/ अदखलपात्र स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी सर्व ठाणेदारांना दिलेले आहे.
बंदचे आवाहन करणे किंवा समाजामध्ये भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने सामाजिक शांतता भंग करणे- भारतीय दंड विधान सहिता कलम 505(1)(ब ),
रस्ता रोको करणे किंवा रस्ता अडवणे- भारतीय दंडविधान संहिता कलम 341,
सामाजिक मालमत्तेचे नुकसान करणे,किंवा तोडफोड करणे विद्रूपीकरण करणे-भारतीय दंड विधान संहिता कलम 3 व 4 प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवा वर विश्वास ठेवू नये व सामाजिक सलोखा बिघडेल अशी कृती करू नये.
तसेच अफवा पसरविणारे मेसेजेस, इमेज किंवा व्हिडिओ सोशल मीडियाद्वारे किंवा इतर मार्गाने वायरल करू नये. किंवा पाठवू नये जो कोणी अशा प्रकारचे मेसेजेस, व्हिडिओ पोस्ट व्हायरल करेल त्याच्यावर विविध कलमान्वये कारवाई करण्यात येणार आहे.
लातूर पोलिस परिस्थितीवर, सोशल मीडियाच्या माध्यमातून वायरल होणाऱ्या मेसेजेस, व्हिडिओ वर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.