जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पूर्व नियोजन बैठक संपन्न

 

वृत्त क्र.1051                                                                                   दिनांक:- 24 नोव्हेंबर, 2021

 

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पूर्व नियोजन बैठक संपन्न


 

लातूर,दि.24 ( जिमाका ):- जागतिक दिव्यांग दिन 3 डिसेंबर निमित्त शासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था, लायन्स क्लब, रोटरी क्लब सारख्या सामाजिक संघटनेचा सहभाग घेवून तसेच दिव्यांगाच्या विशेष शाळा / कार्यशाळेमध्ये दिव्यांगासाठी विविध कार्यक्रम राबविणे बाबत आयुक्त, दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे यांचेमार्फत निर्देश देण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक संपन्न झाली.



या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनिल खमितकर,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एम.बी.शिंदे,अधिष्ठता विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे डॉ.लक्ष्मण सुरकुंडे,सहाय्यक आयुक्त्,समाजकल्याण विभाग शिवकांत चिकुर्ते,सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास विभाग बालाजी मोरे,अति.आयुक्त,महानगरपालिका शिवाजी गवळी, लिड बँक शाखा व्यवस्थापक अे के कसबे, विविध विभागातील प्रतिनिधी तसेच ऑनलाईन व्हि. सी. व्दारे पंचायत समितीमधील सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये महारार्ष्टातील पहिल्या दिव्यांगासाठी जिल्हा परिषद मार्फत कला ॲकॅडमी व इ- अभ्यिासिकेचे तसेच उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर मधील देशातील पहिल्या सेंन्सरी गार्डनचे उद्घाटन तसेच भव्य मानसिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या मार्फत दिव्यांगाच्या विविध तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. महानियंत्रक राज्‍य परिवहन यांच्या मार्फत UDID वरुन बस पास तयार करण्यासाठी पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे.

आयुक्त समाज कल्याण यांच्या मार्फत जेष्ठ दिव्यांगाचा सत्कार समारंभ, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास यांच्या मार्फत दिव्यांगासाठी डाटा एन्ट्री प्रशिक्षणाचे आयोजन लायन्स क्लब उदगीर यांच्या मार्फत 26 डोळयांच्या शस्त्रक्रियेसाठी शिबीराचे आयोजन, पंचायतसमिती स्तरावरुन दिव्यांगासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे बाबत जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बैठकीमध्ये सुचना दिलेल्या आहेत.

                                                                          ***

वृत्त क्र.1052                                                                                    दिनांक:- 24 नोव्हेंबर, 2021

 

जिल्हयातील दिव्यांगासाठी मोफत आरोग्य तपासणी

शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

लातूर,दि.24 ( जिमाका ):- समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद, लातूर व सिध्दीविनायक प्रतिष्ठाण, लातूर यांच्या संयुक्त विद्यामाने उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर आयोजित मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर दि. 03 डिसेंबर 2021 रोजी आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरामध्ये पूढील आजाराचे निदान व उपचार केले जातील.

ऑटीझम (स्वमग्नता), बहुविकलांगता, मतिमंदता बुध्दअंकमापन, मुलांतील अतिचंचलता, हात पाय वाकडे असणे,मुल अभ्यासात हुशार नसणे, मुलांचे लिहिण्या-वाचण्यातील दोष,मुले उशीरा चालणे व बोलणे, हात-पाय कमजोर असणे अशा प्रकारच्या दिव्यांगत्वार उपचार केले जाणार आहेत.

या शिबीरामध्ये विविध आजाराचे निदान व उपचार करण्यासाठी मेंदू विकार तज्ञ डॉ. प्रशांत उटगे, ह्दय विकार तज्ञ डॉ. नितीन येळीकर, कान-नाक घसा ता डॉ. शैला सोमाणी, डोळयांचे विकार तज्ञ, डॉ. उमेश भामकर, हाडांचे विकार व शस्त्रक्रिया तज्ञ प्रसिध्द डॉ. तरल नागडा, ज्युपीटर हॉस्पीटल, मुंबई यांची टिम तसेच जेनेटीक तज्ञ डॉ. गायत्री आय्यर हे उपस्थित राहणार आहेत. सदर शिबीराचे आयोजन उमंग ईन्सटीटयुट ऑफ ऑटीझम ॲन्ड मल्टीडिसॅबीलीटी रिसर्च सेंटर, नवनी कलेक्टर ऑफीसच्या पाठीमागे शासकीय कॉलनी, बार्शी रोड, लातूर येथे करण्यात येत असून लाभार्थ्यांनी या क्रमांकावर 02382-221999 व 9921696056 या क्रमांकावर संपर्क साधावा.

या शिबीराचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल केंद्रे तसेच समाज कल्याण सभापती रोहिदास वाघमारे यांनी केले आहे.

 

                                                                           ****

वृत्त क्र.1053                                                                                    दिनांक:- 24 नोव्हेंबर, 2021

 

 

जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर

सरळ व संयुक्त खतातून पिकांना संतुलित प्रमाणात खत द्यावे

 

लातूर,दि.24 ( जिमाका ):- राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत्‍ मृद आरोग्य पत्रिकेच्या दुसऱ्या चक्रानुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी नत्र- कमी, स्फुरद – मध्यम आणि पालाश- भरपूर अशी आहे. त्यानुसार या रब्बी हंगामात हरभरा, करडई व रब्बी ज्वारीच्या भरगोस उत्पादनासाठी संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, दत्तात्रय  गवसाने यांनी केले आहे.

जमिन आरोग्य पत्रिका अभियान अंतर्गत दुसऱ्या चक्रानुसार (सायकल) च्या नुसार लातूर जिल्हयातील सुपिकता निर्देशांक पातळी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हयातील शासकीय जिल्हा मृद चाचणी प्रयोगशाळे मार्फत जिल्हयातील 943 ग्रामपंचायत मध्ये मृद परीक्षण अहवालानुसार सुपिकता निर्देशांक फलक तयार करुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत लावण्यात आले आसून, त्यात क्षेत्रीय कर्मचाऱ्यामार्फत गावनिहाय सुपिकता निर्देशांकानुसार खताचा पिकनिहाय वापर या बद्दल पेरणी पूर्व मार्गदर्शन करण्यात आले. यात बाजारात उपलब्ध्‍ असलेल्या खताच्या अनुषंगाने सरळ व संयुक्त खताचा वापर करुन खताच्या खर्चात बचत करण्याचे आवाहन करण्यात आले.

जिल्हयात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान अंतर्गत हरभरा 1356 हेक्टर, करडई 450 हेक्टर व रब्बी ज्वारी 1140 हेक्टरवर पिक प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले आहे. यात मृद परिक्षण अहवालनुसार संतुलित खताचा वापर करुन उत्पादन वाढीचे लक्षांक साध्य करण्यात येणार आहे.

 

                                                                            ****

वृत्त क्र.1054                                                                                दिनांक:- 24 नोव्हेंबर, 2021

 

            विशेष मतदार नोंदणी शिबीरचे 27 व 28 नोव्हेंबर रोजी आयोजन

 

          लातूर,दि.24 ( जिमाका ):-  मुख्य निवडणूक अधिकारी यांचे निर्देशानुसार दिनांक 27 व 28 नोव्हेंबर, 2021 या दिवशी प्रत्‍येक मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूकअधिकारी सदाशिव पडदुणे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

भारत निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार दिनांक 01 जानेवारी 2022 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रमानुसार दिनांक 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. तसेच, दिनांक- 01 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आलेली असून अंतिम मतदार यादी दिनांक 05 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध होणार आहे. दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक मतदार म्हणून नोंदणीस पात्र होणार आहेत. नुकत्‍याच पार पडलेल्‍या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्‍हणून नोंदणी झालेली नाही अथवा आपण अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा नागरिकांना छायाचित्र मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत आपले नाव मतदार म्हणून नोंदवता येणार आहे.

या कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्हयातील सर्व मतदान केंद्रांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांना नागरीकांकडून नांव नोंदणीबाबतचे अर्ज स्विकारण्यासाठी उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यांत आले आहेत. राजकीय पक्षांचे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ता (BLA) यांनी सदर मोहिमेस उपस्थित राहावे, असे अवाहन केले आहे. सदर कार्यक्रमास सहायक मतदार यादी निरीक्षक तथा उपायुक्त (पुरवठा), विभागीय आयुक्त कार्यालय,औरंगाबाद हे भेट देणार आहेत. तसेच, दिनांक 25 नोव्हेंबर 2021 रोजी लातूर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात   प्रभाग निहाय मतदार यादी वाचन कार्यक्रम आयोजित कारण्यात येणार असून त्यामध्ये मतदार यादीचे वाचन करण्यात येणार आहे.

        छायाचित्र मतदार ओळखपत्र हे मतदारांची ओळख पटविण्‍यासाठी असून मतदारांचे नाव मतदार यादीत असेल तरच मतदान करता येते. त्‍यासाठी त्‍यांचेकडे ओळखपत्र असले तरीही मतदार यादीत नाव असल्‍याची खातरजमा करून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदानाच्या दिवशी मतदानाचा हक्क गमावण्याची वेळ येणार नाही. तसेच, नागरिकांना एकापेक्षा अधिक ठिकाणी मतदार यादीत नाव समाविष्ट करता येणार नाही.

        नागरीकांना आपले नाव मतदार यादीत तपासण्‍यासाठी https://ceo.maharashtra.gov.in किंवा www.electoralsearch.in या संकेतस्थळाला भेट द्यावीसदर कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी किंवा आपल्या नोंदीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आपणास Voter Helpline App  या मोबईल अॅप द्वारे किंवा https://www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट देऊन नोंदणी करता येईल.         

       त्‍यानुसार लातूर जिल्ह्यातील दिनांक 01 जानेवारी 2022 रोजी 18 वर्ष पूर्ण करणारे नागरिक व अद्याप मतदार म्हणून नोंदणी केली नसेल अशा सर्व पात्र नागरीकांनी छायाचित्र मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार नोंदणीसंदर्भात विशेष मोहिमेत विहित नमुन्यातील अर्ज भरून (आवश्यक कागदपत्रासह) आपले नाव मतदार यादीमध्‍ये नोंदवावे, असे अवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारीपृथ्वीराज बी.पी., यांनी केले आहे.

अर्जाची माहिती

प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या मतदारांसाठी अथवा मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी- अर्ज क्र. 6 अनिवासी मतदारांचे मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी- अर्ज क्र. 6 अ, इतर व्यक्तीचे नाव समाविष्ट करण्याबाबत आक्षेप घेण्यासाठी / स्वतःचे नाव वगळण्यासाठी / इतर  कोणत्याही व्यक्तीचे नाव मृत्यू किंवा स्थलांतर झाल्यामुळे वगळण्यासाठी- अर्ज क्र., मतदार यादीतील तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्त्यांसाठी- अर्ज क्र. 8 व ज्यावेळी एकाच मतदारसंघात निवासस्थान एका ठिकाणाहून इतर ठिकाणी स्थानांतरित झाले असल्यास- अर्ज क्र. 8 अ

                                     ****

वृत्त क्र.1055                                                                                  दिनांक:- 24 नोव्हेंबर, 2021

 

 विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी

मोफत टॅबचे वाटप

 

          लातूर,दि.24 ( जिमाका ):-  महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या एमएचटी-सीईटी, जेईई, नीट (MHT-CET/JEE/NEET) या प्रकल्पाअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात आल्याचे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त एस. एन. चिकुर्ते यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.    

या कार्यक्रमात  महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) संचालक लक्ष्मण वडले यांचे हस्ते विद्यार्थ्याना मोफत टॅब वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमास

प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवशटवार, समाज कल्याण विभाग लातूर तसेच समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, शिवाजी  माने, बालाजी रेड्डी, शोभा बेंजरगे तसेच एमएचटी-सीईटी, जेईई, नीट (MHT-CET/JEE/NEET)   परिक्षेची  तयारी करणारे  39 पात्र लाभार्थी विद्यार्थी  उपस्थित  होते.

000

 


--
लातूर जिल्हा माहिती कार्यालयाकडून पाठविण्यात आलेल्या बातम्यांसाठी पुढील लिंकला फक्त क्लिक करा आणि वाचा संपूर्ण बातमी.

फेसबुक पेज-  DIOlatur-ज़िल्हा-माहिती-कार्यालय-लातूर

ट्विटर-  https://twitter.com/Infolatur
ब्लॉग-  http://laturdio.blogspot.com/

मुख्यालय संकेतस्थळ-https://mahasamvad.in/ https://www.facebook.com/MahaDGIPR https://www.facebook.com/CMOMaharashtra/ https://twitter.com/MahaDGIPR http://www.mahanews.gov.in  http://maharashtradgipr.blogspot




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या