पोलीस स्टेशन उदगीर शहर चे पोलीसांची कामगिरी. खुनातील आरोपीला 12 तासाच्या आत घेतले ताब्यात.*

 *पोलीस अधीक्षक कार्यालय,लातूर*


                        *प्रेस नोट*


           *दिनांक:24/11/2021*


              *पोलीस स्टेशन उदगीर शहर चे पोलीसांची कामगिरी. खुनातील आरोपीला 12 तासाच्या आत घेतले ताब्यात.*पोलीस स्टेशन उदगीर शहर चे पोलीसांची कामगिरी. खुनातील आरोपीला 12 तासाच्या आत घेतले ताब्यात.*




लातूर रिपोर्टर न्यूज़ ब्यूरो 

             याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23/11/2021 संध्याकाळी 08  वाजण्याच्या सुमारास उदगीर शहर पोलीसांना माहिती मिळाली की, बसस्टँड उदगीर परिसरातील पत्र्याच्या शेडमध्ये एक अनोळखी इसमास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून दगडाने डोक्यावर मारून गंभीर जखमी करून खून केला आहे. अशी माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री. डॅनियल बेन, पोलीस निरीक्षक गोरख दिवे व त्यांची टीमने घटना स्थळास भेट दिली व परिसरातील व्यक्तींकडे मयत व्यक्तीबाबत चौकशी करून माहिती मिळवून मयत व्यक्तीची ओळख पटविली.

        सदर मयत व्यक्ती चे नाव  बाबुराव पांचाळ, राहणार लोदा, तालुका भालकी जिल्हा बिदर येथील असल्याचे समजले. त्यावरून उदगीर बस डेपो मॅनेजर श्री कानतोडे यांचे फिर्यादीवरूनअज्ञात आरोपीच्या विरुद्ध पोलीस स्टेशन उदगीर शहर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/2021, कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.



             पोलीस अधीक्षक श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन यांनी सदर गुन्ह्यातील आरोपी चा शोध घेण्याबाबत उदगीर शहर पोलिसांना मार्गदर्शन करून तपासा बाबतीत आवश्यक सुचना देण्यात आल्या. त्यावरून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॅनियल बेन यांचे मार्गदर्शनात उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. गोरख दिवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड पोलीस उपनिरीक्षक एडके तसेच पोलीस स्टेशन उदगीरचे पोलीस अमंलदार यांनी रात्रभर तपासाची चक्रे फिरवून घटनेबाबत विविध लोकांकडे कचरा वेचणारे इसम, रिक्षेवाले, हातगाडीवाले यांच्याकडे चौकशी करून तसेच मिळालेल्या माहितीचे विश्लेषण करून गुन्ह्यातील संशयित आरोपी नामे 

1)ईरवंत नागनाथ मानकरी, वय 43 वर्ष, राहणार_ लुल्ली गल्ली, देवनी याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडे सदर गुन्ह्याबाबत विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने सदरच्या व्यक्तीचा खून केल्याची कबुली दिल्याने त्यास उदगीर शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

              गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एडके हे करीत आहेत.

               सदरची कामगिरी वरिष्ठांचे  मार्गदर्शनात उप विभागीय पोलीस अधिकारी उदगीर श्री डॅनियल बेन व

 पोलीस निरीक्षक श्री.गोरख दिवे यांचे नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक श्री एडके, पोलीस अंमलदार बबन टारपे, श्रीकृष्ण चामे, गजानन पुल्लेवाड, विष्णू गुंडरे, अभय सगर ,पवन गायकवाड,जायभाये, राहुल गायकवाड, तुळशीराम बरुरे यांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या