मुस्लिम आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे केले धरणे आंदोलन
लातूर,दि.२४ःन्यायालयाने मान्यता दिलेले ५ टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावे या अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडी लातूर जिल्हाच्यावतीने बुधवार,दि.२४ नोव्हेंबर २०२१ रोजी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवसभर धरणे आंदोलन करण्यात येवून जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले.
धार्मिक भावना भडकावून समाजात तेढ निर्माण करणार्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहंमद बिल येणार्या हिवाळी अधिवेशनात पास करुन ते तात्काळ लागू करावे, न्यायालयाने मान्य केलेले ५टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावे, महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकतीमध्ये वाढ करुन इमाम, मुअज्जिन आणि खुद्दाम हजरात यांना मासिक वेतन सुरु करावे, संत विचारांचा प्रचार,प्रसार करणार्या किर्तनकरांना शासनाने मासिक वेतन सुरु करावे, वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा,सारथी-बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी आदी मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने बुधवारी राज्यव्यापी धरणे आंदोलनाचे आयोजन केले होते,त्याचा एक भाग म्हणून लातूर जिल्हाधिकारी कचेरीसमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात येवून मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शिष्टमंडळाने दिले.
जिल्हाध्यक्ष जगदिश माळी यांच्या नेतृत्वात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हा महासचिव डॉ.तात्याराव वाघमारे, जिल्हा संघटक सचिन लामतूरे, जिल्हा प्रवक्ता चक्षुपाल कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष विनय ढवळे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड.रोहित सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष गौतम उजेडकर, जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष मंजूषा निंबाळकर, जिल्हा युवा अध्यक्ष युवराज जोगी, युवक जिल्हा महासचिव नितीन गायकवाड, महानगर अध्यक्ष ऍड.सुभेदार मादळे, शहर महासचिव ऍड.अरशद पठाण, शहर सचिव सौदागर घोलप, शहर संघटक निलेश कंाबळे, शहर महिला अध्यक्षा सुजाता अजनीकर, शहर सचिव आसमा शेख, शहर संघटक समिना शेख यांच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाले होते.
0 टिप्पण्या
Do not enter this spam link in comment comment box.