महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे विवेकानंद रूग्ण सेवा सदनास केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 11 लक्ष रूपयाची देणगी सुपूर्द

 

महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे विवेकानंद रूग्ण सेवा सदनास
केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत 11 लक्ष रूपयाची देणगी सुपूर्द










लातूर दि.25.11.2021
लातूर येथील विवेकानंद मेडिकल फाउंडेशन आणि रिसर्च सेंटर द्वारा संचालित विवेकानंद रूग्ण सेवा सदन लोकार्पन दिनाच्या कार्यक्रमाचे औचित्य साधून ना.नितीनजी गडगकरी यांच्या उपस्थीतीत लातूरचे जेष्ठ नेते तथा भाजपा राष्ट्रीय किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी मा.आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर,व बँकेचे तज्ज्ञ संचालक अजितसिंह पाटील कव्हेकर यांच्याहस्ते महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे 11 लक्ष रूपयाचा धनादेश पद्मभूषण डॉ.अशोकजी कुकडे काका यांच्याकडे सुपूर्द केला.
यावेळी एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, बँकेचे संचालक बाबासाहेब कोरे, सूर्यकांतराव शेळके, निळकंठराव पवार, बापूसाहेब गोरे, डॉ.हेगडेवार रूग्णालय संभाजी नगरचे डॉ.अनंत पंढरे, विवेकानंद हॉस्पिटलचे सवेसर्वा पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे, विवेकानंद  रूग्णसेवा सदन समितीचे अध्यक्ष बी.बी.ठोंबरे, विवेकानंद मेडीकल फांउंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सौ.अरूणा देवधर आदी मान्यवरांची उपस्थीती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी केंद्रियमंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व भाजपा युवा नेते नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांचा सेवाव्रत्तीतून केलेल्या 11 लाखाच्या मदतीबद्दल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
विवेकानंद मेडीकल फौंडेशन अ‍ॅन्ड रिसर्च सेंटर लातूरद्वारा संचलित विवेकानंद रूग्णसेवा सदनाचा लोकार्पन सोहळा संपन्‍न झाला. विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेल्या आठ वर्षापासून लातूर व परिसरातील कर्करोग पिडीत रूग्णांना उपचार देण्याचे काम केले जात आहे. रेडिएशन थेरीपीद्वारे उपचार घेणार्‍या रूग्णांना आठवड्यातील पाच दिवस रोज अर्धा तास असा एक ते दीड महिना उपचार घ्यावे लागतात. यामुळे रूग्णास बराच शारिरीक व मानसिक थकवा येतो. अशा स्थितीमध्ये बाहेर गाववरून येणार्‍या रूग्णांना रोज गावाकडे ये-जा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च सहन करावा लागतो. ही अडचण लक्षात घेऊन अशा ग्रामीण भागातील रूग्णांची सोय हॉस्पिटलच्या परिसरातच सवलतीच्या दरात व्हावी. यासाठी विवेकानंद रूग्णसेवा सदनाचे लोकार्पन करण्यात आले. यामध्ये खारीचा वाटा म्हणून भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याकडून एम.एन.एस.बँकेच्यातर्फे 11 लाखाचा निधी पद्मभूषण डॉ.अशोक कुकडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. या कार्यक्रमाला लातूर शहर व परिसातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
-------------------------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या