लातूरच्या प्रसिद्ध उद्योगपतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

 लातूरच्या प्रसिद्ध उद्योगपतीविरुद्ध गुन्हा 

दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश 




लातूर, दि. १० : लातूर येथील उद्योजक विनोदकुमार गिल्डा यांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांच्याविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश लातूरच्या प्रथम वर्ग - ६   यांनी दिले आहेत. 
                          लातूरचे उद्योजक विनोदकुमार रामगोपालजी गिल्डा यांनी लातूरच्या उद्योग भवन परिसरातील महाराष्ट्र शासनाची जागा, जी   लातूर औद्योगिक सहकारी संस्थेकडे भाडे तत्वावर आहे. त्याचा प्लॉट क्र. ९० हा पोट  भाडेपट्ट्याने घेतलेला आहे. हा प्लॉट लातूरचेच दुसरे एक उद्योगपती दिनेश मुरलीधर इनानी यांनी त्यांच्या राजलक्ष्मी पेट्रोकेम प्रा. लि . साठी औद्योगिक वसाहतीचे नाहरकत प्रमाणपत्र घेऊन लघु उद्योग बँक, मुंबई यांच्याकडे सन २००४ साली  तारण करून  दिला  होता .  सन  २०१४ मध्ये सदरील कर्ज परतफेड झाल्यानंतर सदरील लघु उद्योग बँकेकडे दिलेली ही  कागदपत्र  दिनेश इनानी  यांनी विनोदकुमार  गिल्डा यांच्या परस्पर हस्तगत करून   जनता सहकारी बँक लि. , पुणे यांच्याकडून  १२ कोटी रुपयांच्या कर्जासाठी खोटे दस्तावेज तयार करून,  त्यावर विनोदकुमार गिल्डा यांच्या खोट्या सह्या करून  तारण ठेवल्याचे  दाखवले. याकामी त्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संगनमत केल्याचे दिसते . ज्यावेळी गिल्डा यांना  आपल्या अन्य व्यवहाराकरिता या प्लॉटच्या  ओरिजनल भाडेपट्ट्याची आवश्यकता पडली, त्यावेळी त्यांनी दिनेश इनानी यांच्याकडे  दस्तावेजाची मागणी केली. त्यावेळी त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली. इनानी  याप्रकरणी टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास येताच गिल्डा यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती काढण्याचा प्रयत्न केला असता,  त्यांच्या प्लॉटचे ओरिजनल दस्तावेज दिनेश इनानी  यांनी विनोद  गिल्डा यांच्या परस्पर पुणे जनता बँकेकडे तारण ठेवल्याचे निदर्शनास आले. 
जनता सहकारी बँकेच्या या चुकीच्या कर्ज वितरणाच्या प्रकरणावर पडदा घालण्याच्या उद्देशाने बँकेने सदरील कर्ज वसूल करण्यासाठी हे प्रकरण   सीएफएम ऍसेट रिस्ट्रक्चर कं . लि. मुंबई  यांच्याकडे  कवडीमोल किंमतीत हस्तांतरित केले. सदरील  बनावट व चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे करण्यात आलेल्या या व्यवहार प्रकरणी विनोद गिल्डा यांचा प्लॉट सीएफएम कंपनी व   दिनेश इनानी  संगनमत करून परस्पर, बेकायदेशीररित्या  विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत.  या प्रकरणी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याबरोबर विनोद  गिल्डा यांनी पोलिसात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल करून घेण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे नाईलाजाने गिल्डा यांनी या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या संपूर्ण प्रकरणाची शहनिशा केल्यानंतर लातूरच्या प्रथम वर्ग - ६  यांनी लातूरच्या शिवाजीनगर पोलिसांना दिनेश इनानी यांच्या राजलक्ष्मी पेट्रोकेम प्रा. लि  . ओयासिस अल्कोहल लि . , जनता सहकारी बँक लि. पुणे व सीएफएम ऍसेट रिस्ट्रक्चर कं . लि. मुंबई  यांच्याविरुद्ध भादंवि. कलम ४०३, ४०५, ४०६, ४०९, ४२०, ४६३, ४६७, ४६८, ४६९, ४७० , ४७३ कलम ३४ अंतर्गत  तात्काळ फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.  याप्रकरणी गिल्डा यांच्या वतीने एड. व्यंकट नाईकवाडे व एड. निलेश जाजू यांनी काम पाहिले . 
------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या